दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे, शहरांचा विस्तार होतांना शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. वातावरणातील होणारा बदल त्यामुळे हायड्रोपोनिक शेती चा पर्याय विचारात घेतला जातो.आजही देशाच्या अनेक भागतील शेतकऱ्यांसाठी हायड्रोपोनिक शेती हा कुतूहलाचा विषय आहे. आज आपण हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान What is Hydroponic Farming? | हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान संपूर्ण माहिती 2024 घेणार आहोत. हायड्रोपोनिक शेती मध्ये कमी जागेत ज्यास्त उत्पादन घेतले जाते. हि शेती म्हणजे माती विरहीत शेती मातीचा वापर न करता झाडांना लागणारी पोषक द्रव्ये हि पाण्यातून दिली जातात यालाच हायड्रोपोनिक असे म्हणतात.
What is Hydroponic Farming? | हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान संपूर्ण माहिती 2024
हि एक आधुनिक शेती आहे. हायड्रोपोनिक म्हणजे माती न वापरता पाण्यातून झाडांना आवश्यक पोषक द्रव्ये देऊन झाडाची वाढ केली जाते ,ह्यामध्ये आपण कमीत कमी जागेमध्ये ज्यास्त उत्पादन घेऊ शकतो. हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये १६ सें.मी व्यासाच्या पीव्हीसी पाईप मध्ये झाडांची लागवड केली जाते. यामध्ये पाईप चा उतार ४ अंश च्या प्रमाणात ठेवला जातो . पाईप च्या वरील बाजूस छिद्र केले जाते त्या छिद्रात झाडे लावली जातात.
पाईप मध्ये पाणी सोडले जाते. त्या पाण्यात झाडांची मुळे बुडालेली असतात. पाण्यात झाडाला आवश्यक असणारी पोषक द्रव्ये मिसळली जातात. यामध्ये कोकोपीट ,वाळू यांचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. लहान वनस्पती असलेल्या पिकासाठी हे तंत्र खूप उपयोगी आहे .या मध्ये झाडांना पोषक असे तापमान नियंत्रित ठेऊन आर्द्रता 80-85 टक्के ठेवली जाते. पिकांच्या वाढीसाठी पाणी ,पोषक द्रव्ये आणि पुरेसा सूर्यप्रकाश या तीन गोष्टी ची आवशकता असते. हायड्रोपोनिक शेती मध्ये ह्या तीन गोष्टी योग्य प्रमाणात नियंत्रित करून शेती केली जाते.
हायड्रोपोनिक तंत्राद्वारे घेतली जाणारी पिके
What is Hydroponic Farming? | हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान संपूर्ण माहिती 2024 यामध्ये उपलब्ध जागेचा योग्य वापर करून पिके घेतली जातात. गाजर ,सलगम, वाटणा, टोमॅटो, मुळा ,तुळस ,टरबूज, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी अननस ,भेंडी, पालक , काकडी , सेलेरी , मिरची, औषधी वनस्पती इत्यादी रोपे चांगल्या प्रकारे वाढवली जातात.
हायड्रोपोनिक पद्धतीचे प्रकार ( Types of Hydroponic System )
- विक हायड्रोपोनिक सिस्टम ( Hydroponic Wick Systems )
- डीप वॉटर हायड्रोपोनिक सिस्टीम ( Deep water hydroponic system )
- न्यूट्रियंट फिल्म टेक्निक ( Nutrient film technique (NFT)
- रिकव्हरी ट्रिप सिस्टीम ( Recovery Drip System )
- नॉन रिकव्हरी ड्रीप सिस्टीम ( Non Recovery Drip System )
- ड्रिप सिस्टम ( drip system hydroponic )
हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान चे फायदे
What is Hydroponic Farming? | हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान संपूर्ण माहिती 2024
या शेती तंत्रज्ञान मध्ये मातीची आवशकता नसते ,जिथे माती कमी असेल , मातीची गुणवत्ता ,किवा माती पिके घेण्यायोग्य नसेल त्या ठिकाणी हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान उपयोगी पडेल.
मशागत , सिंचन ,खुरपणी ,अशी कामे करावी लागत नाही ,त्यामुळे वेळेची आणि मजुरांची बचत होते.
कमी जागेमध्ये ज्यास्तीत ज्यास्त उत्पादन घेऊ शकतो.100 स्क्वेअर फुट जागेमध्ये 200 रोपे लावता येतात
बाहेरील वातावरणातून येणाऱ्या किडी पासून पिकला संरक्षण मिळते.
हायड्रोपोनिक तंत्रज्ञान मध्ये तापमान, आर्द्रता आणि प्रकाश नियंत्रित करून पिकांच्या वाढीसाठी पोषक असे वातावरण निर्माण केले जाते. त्यामुळे बाराही महिने पिके घेतली जातात.
पाण्याचा वापर कमी होतो फक्त 10 % पाण्याचा वापर होतो. पोषक द्रव्ये असलेले पाण्याचा पुनर्वापर होतो.
कमीत कमी जागेमध्ये नियंत्रित पद्धतीत व भरपूर पोषक घटकांच्या सहाय्याने भाज्यांचे व फळांचे भरपूर उत्पादन घेता येते.
हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान फायद्याचे आहे का ?
What is Hydroponic Farming? | हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान संपूर्ण माहिती 2024 ह्या लेखामध्ये आपण हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान बद्दल माहिती घेत असताना हे तंत्रज्ञान कितीपत फायद्याचे आहे हे पाहूया
100 स्क्वेअर फुट जागेमध्ये 200 रोपे लावता येतात. 100 स्क्वेअर फुट जागेमध्ये हि सिस्टीम बसविण्यासाठी 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो . सिस्टीम चा खर्च एकदाच येतो यामध्ये सुरवातीला जरी आर्थिक गुंतवणूक असली तरी ह्यामध्ये परत गुंतवणूक करावी लागत नाही ,तुम्ही एक पिक काढल्यानंतर दुसरे पिक लगेच घेऊ शकता , कमी कालावधीच्या पालेभाज्या ,ज्यास्त मागणी असणारी फळे यांचे उत्पादन करून तुम्हाला ज्यास्त नफा मिळू शकतो.
हायड्रोपोनिक प्रणाली बसविण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घेण्यासाठी सोबत दिलेल्या संकेतस्थळास भेट दया https://jagdambfarming.com/
हायड्रोपोनिक शेती करिता आवश्यक मुद्दे
गुंतवणूक- हायड्रोपोनिक प्रणाली बसविण्यासाठी सुरवातीला गुंतवणूक करावी लागते, तुम्हाला जागेचे किती क्षेत्र वापरात घ्यायचे आहे त्यावर हि सिस्टीम बसविण्यासाठी चा खर्च अवलंबून आहे. यामध्ये प्रत्येक वेळी पिके घेताना हायड्रोपोनिक प्रणाली बसवण्यासाठीचा खर्च येत नाही.
देखभाल – करतांना नियमित देखभालीची आवशकता असते, PH चे प्रमाण नियंत्रित ठेवणे, तापमान नियंत्रित करून ते कायम ठेवणे सिस्टीम साठी वापरण्यात येणारे वीज पंप यांची कार्यक्षमता वेळोवेळी तपासणे.
तांत्रिक ज्ञान – आपल्याला कोणतीही नवीन प्रणाली राबवायची म्हंटले तर त्याचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. हायड्रोपोनिक शेती करतांना तांत्रिक ज्ञान घेणे आवश्यक आहे , तुम्ही जर तांत्रिक ज्ञान घेऊन केली तर भरपूर उत्पादन घेऊन तुम्ही लवकर यशस्वी होऊ शकता.आणि चांगला नफा मिळवू शकता. हायड्रोपोनिक शेती चे तांत्रिक ज्ञान घेण्यासाठी तुम्ही MCED ( Maharashtra Centre for Entrepreneurship Development ) या संस्थेशी संपर्क करू शकता. MCED संकेतस्थळ https://mced.co.in/
हायड्रोपोनिक शेतीचे भविष्य काय आहे
What is Hydroponic Farming? | हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान संपूर्ण माहिती 2024 ह्या लेखा मध्ये हायड्रोपोनिक शेती चे भविष्य काय आहे त्याबद्दल माहिती घेऊयात बदलते हवामान ,जागेचा होणारा व्यवसाईक वापर ,जमिनीचा झालेला ऱ्हास त्यामुळे दिवसेंदिवस पारंपारिक शेती चे प्रमाण कमी होत आहे, हायड्रोपोनिक शेती मध्ये कमी जागेत ज्यास्त उत्पादन घेऊ शकतो , शहरी भागामध्ये सुद्धा हायड्रोपोनिक शेती करू शकतो. ह्या शेती मध्ये पिकांची वाढ लवकर होते त्यामुळे कमी कालावधी मध्ये ज्यास्त उत्पादन घेऊ शकतो . त्यामुळे प्रगतीशील शेतकरी हायड्रोपोनिक शेतीला पसंती देत आहेत
जगदंबा हायड्रोपोनिक्स चे विशाल माने हायड्रोपोनिक शेती करून चांगले उत्पन्न कमवत आहेत व त्यांच्या कंपनीद्वारे शेतकर्यांना हायड्रोपोनिक प्रणाली चे प्रशिक्षण देतात. तेलंगण चे शेतकरी हरिश्चंद् रेड्डी हायड्रोपोनिक शेती द्वारे लाखो रुपये कमवत आहेत ,त्यांनी सुद्धा ह्या प्रणालीचे प्रशिक्षण घेऊन आणि सखोल अभ्यास करून हायड्रोपोनिक शेती ला उत्तम व्यवसायाचे स्वरूप दिले आहे. भविष्यात हायड्रोपोनिक शेती करण्याकडे लोकांचा कल वाढणार आहे.
हायड्रोपोनिक शेतीसाठी शासकीय अनुदान
हायड्रोपोनिक शेती करिता शासकीय अनुदान मिळते. हायड्रोपोनिक शेती साठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनुदान देते .विविध राज्यामध्ये अनुदान देय रक्कम वेगवेगळी असू शकते. राष्ट्रीय फलोत्पादन महामंडळ ( NHB ) सुद्धा अनुदान देते.राष्ट्रीय फलोत्पादन महामंडळाच्या संकेतस्थळास भेट देऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता https://www.nhb.gov.in/
महाराष्ट्र सरकारने हायड्रोपोनिक पद्धतीने चाऱ्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 % अनुदान जाहीर केले आहे .
Conclusion
What is Hydroponic Farming? | हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान संपूर्ण माहिती 2024 आपण ह्या लेखा मध्ये घेतली.हायड्रोपोनिक शेतीचे तंत्रज्ञान समजून घेऊन आणि त्याचा सखोल अभ्यास करून आपण हायड्रोपोनिक शेती ला व्यवसाईक स्वरूप देऊ शकतो. सतत बदलत्या वातावरणावर अवलंबून न राहता हायड्रोपोनिक प्रणाली वापरून आपण आता शेती करू शकतो. ह्या तंत्रज्ञान मध्ये सुरवातीला खर्च ज्यास्त असला तरी हायड्रोपोनिक शेती मधून तुम्ही ज्यास्त नफा कमाऊ शकता. What is Risk-free Hydroponic Farming?| हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान संपूर्ण माहिती तुम्ही हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. अशीच वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळास भेट देत जा.
FAQ
1.हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान म्हणजे काय ?
हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान मध्ये माती न वापरता पाण्यामध्ये पोषक द्रव्ये मिसळून,आणि तापमान व सभोवतालचे वातावरण नियंत्रित करून पिकांचे उत्पादन घेतले जाते.
2. हायड्रोपोनिक शेती मध्ये कोणकोणती पिके घेतली शकतो ?
गाजर ,सलगम, वाटणा, टोमॅटो, मुळा ,तुळस ,टरबूज, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी अननस ,भेंडी, पालक , काकडी , सेलेरी , मिरची, काकडी,औषधी वनस्पती हि पिके हायड्रोपोनिक शेती मध्ये आपण घेऊ शकतो.
3.हायड्रोपोनिक शेती करणे खर्चिक आहे का ?
हायड्रोपोनिक प्रणाली स्थापित करताना सुरवातीला गुंतवणूक करावी लागते हि गुंतवणूक एकदाच करावी लागते, ह्या प्रणाली मध्ये पिकांची वाढ लवकर होत असते, त्यामुळे तुम्ही कमी कालावधी मध्ये ज्यास्त उत्पादन घेऊन नफा कमाऊ शकता
1 thought on “What is Hydroponic Farming? | हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान संपूर्ण माहिती 2024”