Artificial Intelligence म्हणजे काय ? | आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीयर संधी 2024

 Artificial Intelligence म्हणजे काय ? | आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीयर संधी 2024
Artificial Intelligence म्हणजे काय ? | आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीयर संधी 2024

 

आजच्या 21 व्या शतकात AI मुळे  आपल्या  दैनदिन जीवनात अनेक महत्वपूर्ण बदल होत आहे. AI चा वापर प्रत्येक क्षेत्रात होत आहे, आणि AI मुळे प्रत्येक क्षेत्र विकसित होत आहे. जेव्हा AI ची कल्पना अस्तीत्वात आली तेव्हापासून AI ने लोकांच्या जीवनावर विशेष प्रभाव पाडला आहे . AI ला आपण दिलेले तोंडी आदेश समजतात, एखादे स्टार्ट अप सुरु करण्याइतपत AI मदत करू शकते.

AI मानवाच्या कार्यपद्धती पेक्षा अचूक काम करू शकतात. तुम्हालाही प्रश्न पडला असेल हे Artificial Intelligence आहे तरी काय  आज बऱ्याच लोकांना Artificial Intelligence म्हणजे काय ? | आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीयर संधी 2024 हे माहित नाही आज आपण ह्या लेखा मध्ये  Artificial Intelligence बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Artificial Intelligence म्हणजे काय ? | आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीयर संधी 2024

Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वच क्षेत्रात केला जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक कॉम्पुटर सायन्स चा भाग आहे, AI म्हणजे माणसाच्या बुद्धिमत्ते प्रमाणे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीन्स मधील संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान म्हणजे AI होय ,

याच्या संगणक प्रणालीद्वारे आपल्याला  हवी ती कामे करून घेऊ शकतो जसे कि वाचन करू शकतो ,गेम्स खेळू शकतो ,आवाज ओळखू शकतो. सवांद साधने, भाषा ओळखणे इत्यादी कामे करू शकते. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च सेंटर उपलब्ध आहेत .तिथे AI वर नवनवीन प्रयोग होत असतात. तसेच आता शैक्षणिक संस्थांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे महत्व समजले आहे. शैक्षणिक संस्थांनी याचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

जॉन मॅककार्थी ( John McCarthy ) यांनी 1956  साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा शोध लावला होता.  पण  मिळालेल्या माहिती नुसार जेफ्री हिंटन यांना AI चे  गॉडफादर  म्हणतात  दिवसेंदिवस ह्या तंत्रज्ञानाची  मागणी  खूप वाढत आहे.  भविष्यामध्ये सुद्धा माहिती तंत्रज्ञानप्रमाणे  Artificial Intelligence ची मागणी वाढत जाणार आहे, छोट्या छोट्या कामात सुद्धा AI चा वापर वाढत आहे. AI  हे मानवी जीवनाचा एक हिस्सा बनून गेले आहे. मशीन लर्निंग हा सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा भाग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने मशीन ,कॉम्पुटर आणि यंत्र बनवून महत्वाच्या कामामध्ये मानवाच्या ऐवजी AI चा वापर 24 तास  होऊ शकतो

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे प्रकार | Types of Artificial Intelligence

Artificial Intelligence म्हणजे काय ? | आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीयर संधी  2024 ह्या लेखा  मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे कोणकोणते प्रकार आहेत ते पाहूयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे एकूण 7 प्रकार आहेत

  • Artificial Narrow Intelligence
  • Artificial General Intelligence
  • Artificial Super Intelligence
  • Theory of mind
  • Self-Aware
  • Reactive Machines
  • Limited Memory

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे उपयोग | Uses of Artificial Intelligence 

 Artificial Intelligence म्हणजे काय ? | आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीयर संधी 2024

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून मशिनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता बसविण्यात आली  त्यामुळे  मशीन्स देखील मानवाप्रमाणे स्वतः निर्णय घेऊ शकतात, विचार करू शकतात. आपण जसे संगणकाला कमांड देतो तसे मशीन्स ला कृत्रिम बुद्धिमत्ता प्राप्त झाल्यावर आपण कमांड देऊ शकतो आणि मशीन्स स्वतः काय करायचे तो निर्णय घेऊन आपले काम करू शकते

Artificial Intelligence म्हणजे काय ? | आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीयर संधी 2024 हि  माहिती घेताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर रिटेल शॉपिंग, फॅशन , सिक्युरिटी , मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन ,स्पोर्ट्स एनालिसिस अश्या बऱ्याच क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग होत आहे. आपण वापरत असणाऱ्या स्मार्टफोन मधील एप्लिकेशन हे Artificial Intelligence चे उदाहरण आहे.

गुगल मॅप मध्ये AI तंत्रज्ञान वापरले आहे त्यामुळे प्रवास करणे, आपल्या इच्छित स्थळी पोहचणे सगळ्यांसाठी कमालीचे सोईस्कर झाले आहे. जगप्रसिद्ध टेस्ला हि कार बनवणारी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून ड्रायव्हर ची मदत न घेता चालणारी कार बनवत आहे. यामधील सेन्सर्स प्रत्येक मिली सेकंदात हजारो डेटा पॉईंट कॅप्चर करते रस्त्यांची, स्थिती ट्रॅफिक बद्दलची माहिती या आधारे इच्छित  स्थळी पोहोचणार आहे. क्रुझ हि देखील मोठ्या शहरांमधील लोकांना रोबोटॅक्सी पुरवणारी कंपनी आहे .

सध्या अनेक मोठमोठ्या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरून आपल्या कंपनी ला मार्केट मध्ये सिद्ध करत आहेत. ह्या कंपन्या AI चा वापर करून आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत ,आपण एखाद्या कंपनीच्या ॲपवर किंवा वेबसाईटवर आपले प्रश्न विचारले तर त्याची उत्तरे आपल्याला चॅटबोट देतो .ग्राहकांना  त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर ग्राहक समाधानी होतात.

ऑनलाइन बँकिंग व्यवहार , ऑनलाइन डेटा ,फाईल्स सुरक्षित राहू शकतात ,हॅकर्स पासून बचाव होतो. सध्याच्या डिजिटल तंत्रज्ञान मध्ये AI चा वापर वाढत चालला आहे .

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मानवी कौशल्य  

AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आपण दिलेला डेटा ,कमांड याला अनुसरून AI काम करते, हे तंत्रज्ञान यांत्रिक दृष्ट्या सक्षम असते. Ai सगळ्याच ठिकाणी मानवाची जागा घेऊ शकत नाही ,मानव विवेक बुद्धी नुसार काम करतो. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी त्यात  मानवी हस्तक्षेप हा असायलाच हवा. एक  उदाहरण घ्या इस्राईल वर हमास ने दहशतवादी हल्ला केला. इस्राईल हा तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत देश आहे त्यांना त्यांच्या तंत्रज्ञावर पूर्ण भरोसा होता. पण त्यांचे तंत्रज्ञान अपयशी ठरले. हमास ची सीमा रेषेवरील हालचाल ओळखू शकले नाही. हमास ने इस्राईल चे तंत्रज्ञान अपयशी ठरवत दहशतवादी हल्ला केला .पण इस्राईल चे सीमारेषे जवळ पुरेसे सैन्यबळ असते तर या हल्याची तीव्रता कमी झाली असती.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर काम करताना पूर्णपणे विसंबून न राहता सदर प्रणाली वर लक्ष ठेऊन राहणे, त्याचे यांत्रिकीकरण सतत अपडेट करत राहणे हे महत्वाचे आहे.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात करीयर संधी | Career In Artificial Intelligence 

Artificial Intelligence म्हणजे काय ? हि  मीहिती आपण जाणून घेतली आता करीयर बद्दल जाणून घेऊयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या क्षेत्रात करीयर करण्यासाठी खूप संधी आहेत. जर तुम्ही आयटी क्षेत्रात नवीन क्षेत्रातील करीयर मार्ग शोधत असाल तर तुम्ही AI ह्या क्षेत्राचा विचार करू शकता. AI क्षेत्रात काम करून तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता. AI क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी आहेत. AI आधारित नोकऱ्या मध्ये वाढ होत आहे . भविष्यात देखील वाढ राहणार आहे .

बऱ्याचश्या कंपन्या प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि त्यातून मिळनारे परिणाम मिळवण्यासठी कुशल बुद्धिमत्ता व्यवसायिकांच्या शोधात आहेत. AI तंत्रज्ञानामध्ये अधिक नोकऱ्या देणाऱ्या अग्रगण्य श्रेणी मध्ये मशीन लर्निग. डीप लर्निग यांचा समावेश आहे. नवीन विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे अधिक तंत्रज्ञान व्यवसायिक AI करीयर कडे आकर्षित होत आहे.

द डेटा टेक लॅब च्या संशोधन अहवालानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये 2030  पर्यंत डेटा सायंटिस्ट आणि गणिती विज्ञान व्यवसायिकांसाठी नोकऱ्यांमध्ये 33.4 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. व तसेच मशीन लर्निंग, NLP, डीप लर्निग, एनालिटिक्स, रोबोटिक्स, प्रोग्रामर या क्षेत्रामध्ये 29.2 टक्के नोकऱ्या उपलब्ध होतील.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीयर कोर्सेस  

आयटी, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रोनिक्स ,पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्रॅम ,पीजी प्रोग्रामिंग मशीन लर्निंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये करीयर करण्यासाठी कोर्सेस आहेत.

बेंगरूळ मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स नवी दिल्लीतील नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मैसूर मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग, हैदराबाद विद्यापीठ, अहमदाबाद मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्था मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे कोर्सेस उपलब्ध आहेत यांची संकेतस्थळे सोबत दिलेली आहेत

https://iisc.ac.in/ 

https://www.iiita.ac.in/

https://nie.ac.in/

ह्या लेखा मध्ये आपण Artificial Intelligence म्हणजे काय ? | आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीयर संधी 2024  याविषयी माहिती घेतली आहे इच्छुक व्यक्ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये करीयर करून आपले भविष्य उज्ज्वल करू शकतात .वेगवेगळी माहिती घेण्यासाठी वेळोवेळी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा धन्यवाद.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

1 thought on “Artificial Intelligence म्हणजे काय ? | आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीयर संधी 2024”

Leave a Comment