What is Chat GPT ? | Information In Marathi

तुम्हाला सुद्धा  What is Chat GPT ?  हा प्रश्न पडला असेल, आज आपण  What is Chat GPT ? | Information In Marathi ह्या लेखा मध्ये  What is Chat GPT ?  जाणून घेऊयात. आपण Google वर आपल्याला हव्या त्या प्रश्नाचे उत्तर शोधत असतो पण तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर एखाद्या लेखाप्रमाणे लिखित स्वरुपात भेटत असेल तर तुम्हाला आवडेल ना,  तर मग हेच काम  Chat GPT  करत आहे. आज आपण What is Chat GPT ? | Information In Marathi ह्या लेखा मध्ये   What is Chat GPT   जाणून घेऊयात.

इंटरनेट आणि तंत्रज्ञान च्या जगात  Chat GPT  चा वापर वाढत आहे. Chat GPT  हे एक चॅटींग प्लॅटफॉर्म आहे हे तुम्हाला नावावरूनच समजले असेल आपण चॅटींग करून आपल्याला पाहिजे ती माहिती मिळवू शकतो .

Chat GPT  चा वापर करून तुम्ही तुमच्या बॉस ला सुट्टीचा मेल सुद्धा लिहू शकता, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची माहिती क्षणात मिळूवू शकता. चॅट जीपिटी हे एक कृत्रिम बुद्धीमत्ता साधन आहे,

Chat GPT मुळे लोकांच्या नोकऱ्या जातील असे म्हंटले जाते. चॅट जीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे  AI चे  जिवंत उदाहरण आहे.

चॅट जीपीटी चा वापर करून तुम्ही पैसे कमवू शकता ,ते तुम्हाला पैसे कमवण्यासाठी मदत करेल. पैसे मिळवून देणार नाही.आता तुम्हाला प्रश्न पडले असतील हे  Chat GPT आहे तरी काय ,ह्याचा उपयोग आपण कसा करू शकतो, Chat GPT  चे फायदे काय  हे असे काही प्रश्न पडले असतील  तुम्ही  हा लेख पूर्ण वाचा तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळून जातील.

What is Chat GPT ? | Information In Marathi

 

 

काय आहे Chat GPT-What is Chat GPT ? | Information In Marathi

हे एक प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर आहे  हे ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( Open AI ) ने तयार केलेले चॅट बॉट आहे . कि जे तुमच्या  बरोबर संभाषण करू शकते .तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता तो  तुमच्या प्रश्नाचे मुद्देसूद उत्तर सादर करतो. तुम्ही सर्च बॉक्स मध्ये टाकलेल्या प्रश्नांची उत्तरे  समजून घेऊन देते.

 चॅट जीपीटी चे विशेष म्हणजे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरुपात मिळतात. तुम्ही एकच प्रश्न अनेक वेळा विचरला तर तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळी उत्तरे मिळतील.

चॅट जीपीटी हे आता इंग्रजी भाषेसह इतर अनेक भाषांना सपोर्ट करते  आता तुम्ही  मराठी  गुजराती ,हिंदी  व इतर  प्रादेशिक भाषे  मध्ये वापरू शकता. चॅट जीपीटी ला तुम्ही पाहिजेल तो प्रश्न  विचारू शकता  तुम्ह्लाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर लगेच लिखित स्वरुपात मिळेल त्यामुळे कंटेंट रायटिंग ,निबंध , अर्ज , पत्र  लिहिणे आता खूप सोपे झाले आहे

तुम्ही Chat GPT वापरून  You Tube  व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स  ( AI ) चा वापर करून तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता.

Chat GPT विकसित कसे झाले. 

चॅट जीपीटी च्या संस्थापकाबाद्द्ल सांगायचे झाले तर सॅम अल्टमन आणि एलोन मस्क यांनी  २०१५ मध्ये सुरु केली होती नंतर १/२  वर्षानंतर एलोन मस्क यांनी ही कंपनी सोडून दिली .
यानंतर बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टने त्यामध्ये गुंतवणूक केली आणि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रोपोटाईप म्हणून लॉन्च केले. त्यानंतर चॅट जीपीटी ला खूप लोकप्रियता मिळाली.

Chat GPT कसे कार्य करते. | Chat GPT How its Work

 Chat GPT चा लॉंग फॉर्म ( Pre Trained Chat Generative Transformer ) आहे . चॅट जीपीटी साठी त्यांच्या विकसकाद्वारे सार्वजनिक डेटा  वापरला गेला आहे त्या माहितीच्या आधारे हा चॅट बॉट आपल्याशी सवांद साधू शकतो.
Chat GPT आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिखित स्वरुपात देते .आपण जेव्हा गुगल ला प्रश्न विचारतो तेव्हा  Google आपल्याला उत्तराचे विविध पर्याय  शोधून आपल्याला देते ,परंतु Chat GPT तसे करत नाही आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याकडे फीड  केलेल्या डेटा मधून लिखीत स्वरुपात मुद्देसूद पद्धतीत देते.
आपले जर पहिल्या उत्तराने समाधान झाले नाही तर आपण परत तोच प्रश्न विचारू शकतो दुसऱ्या वेळेस आपणास दुसरे उत्तर मिळेल .एकाच प्रश्नाचे प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन उत्तर मिळेल हा वेगळेपणा चॅट जीपीटी मध्ये आहे

Chat GPT कसे वापरावे  What is Chat GPT ? | Information In Marathi

  •  Chat GPT चा वापर करण्यासाठी अगोदर तुम्हाला त्याच्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन तुमचे  Account तुमच्या ई मेल आयडी सह नोंदणीकृत करावे लागते . तुम्ही याचे  GPT-3.5 ( Text Input ) विनामुल्य वापरू शकता .आणि GPT-4 हे विनामुल्य नाही ते वापरण्यासाठी तुम्हाला 20 USD भरावे लागतील. 
  • Chat GPT  चा वापर करण्यासाठी अगोदर तुम्हाला त्याच्या  Chat.openai.com अधिकृत संकेतस्थळास  भेट देऊन तुमचे  Account  तुमच्या ई मेल आयडी सह नोंदणीकृत करावे लागते.
  •  नोदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव टाकवे लागेल त्यानंतर तुम्हाला फोन व्हेरिफिकेशन साठी तुमचा फोन नंबर टाकावा लागेल ज्यावर OTP पाठवला जाईल, तुम्ही OTP  एंटर केल्यानंतर तुमचे  व्हेरिफिकेशन पूर्ण होते.हि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचे Chat GPT  Account  तयार होते. तुम्ही ते सहजपणे वापरू शकता.

Chat GPT चे फायदे  | Advantages of Chat GPT

  •  आपण  विचारलेल्या  प्रश्नांची माहिती  Chat GPT द्वारे आपल्याला थेट लिखित स्वरुपात मिळते.आपण विचारलेल्या प्रश्नाची माहिती तपशीलवार मिळते.
  •  Chat GPT द्वारे आपण विविध विषयावर निबंध लिहू शकतो.तसेच विविध विषयावरची माहिती आपल्याला मिळते. 
  • आपणास सर्च इंजिन द्वारे जी माहिती मिळते ती वेगवेगळ्या लिंक किवा लेखातून मिळते. Chat GPT  मध्ये तसे होत नाही आपण विचारलेली माहिती आपल्याला थेट विशिष्ट मजकुरात मिळते.
  •  Chat GPT हे  वापरण्यास  विनामुल्य आहे.
  • आपण  YouTube  व्हिडिओसाठी  स्क्रिप्ट तयार करण्यासाठी Chat GPT  चा वापर करू शकतो. 

Chat GPT चे तोटे-  What is Chat GPT ?

Chat GPT तुमच्या प्रश्नाची अचूक उत्तरे देईल असे नाही, हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅट बॉट आहे. हा  तुम्ही विचारलेली माहिती त्यामध्ये फीड केलेल्या सार्वजनिक डेटाचा स्त्रोत वापरून आपल्याला देतो.
 Chat GPT  हे फक्त फीड डेटा च्या आधारे माहिती देऊ शकते. Chat GPT  मानवी मेंदू इतकी समज नाही.या टूल कडे २०२२ पर्यंतचा डाटा फीड आहे त्यामुळे अलीकडच्या काळातील माहिती मिळू शकणार नाही.

Chat GPT मुळे नोकऱ्या जातील काय

ह्या प्रश्नाचे उत्तर आत्ता देणे शक्य नसले तरी ,लेख लिहिणे ,कविता लिहिणे या सारखी काम करणाऱ्या व्यक्तीवर याचा परिणाम होईल. चॅट बॉट सध्या तरी त्यामध्ये  फीड असलेल्या  डाटा नुसार माहिती पुरवत आहे ,त्याला  लिमिट आहे .भविष्यात त्यामध्ये सुधारणा होऊ शकते 

Chat GPT  हे Google मागे टाकू शकेल का -What is Chat GPT ? | Information In Marathi

 Chat GPT आणि Google  हे  दोन्ही वेगवेगळी तंत्रज्ञाने आहेत. Google  कडून  आपल्याला  व्हिडिओ , ऑडिओ , इमेज ,लेख, विविध लिंक द्वारे  माहिती मिळते Chat GPT मध्ये तसे होत नाही.Chat GPT  त्यामध्ये फीड केलेल्या डाटा नुसार माहीती देते.
गुगल हे एक सर्च इंजिन आहे  गुगल त्याच्या प्रगत अल्गोरिदम  च्या सहाय्याने वापरकर्त्यास  त्याला हवी तशी माहिती  विविध पर्याय समोर ठेवून उपलब्ध करून देते. गुगल  वापरकर्त्यास वैशिष्ट्ये व्यतिरिक्त व्हॉइस ,ऑटो करेक्ट स्पेलिंग चेक हे सुद्धा प्रदान करते जेणेकरून वापरकर्ते सहज सुलभ आपली माहिती शोधू शकतात.
 Chat GPT आणि Google या दोन्हींची वैशिष्ट्ये भिन्न आहेत या या सर्व कारणांमुळेच म्हटले जाते की सध्या तरी चाट जीपीटी गुगलला मागे टाकू शकत नाही.
Conclusion 
ह्या  What is Chat GPT ? | Information In Marathi लेखामधून तुम्हाला What is Chat GPT ? ह्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मिळाले असेल , chat GPT चे  फायदे तोटे वापर कसा करायचा याची माहिती मिळाली असेल या लेखातील माहिती वाचून तुम्ही सुद्धा Chat GPT चा उपयोग करू शकता.

Leave a Comment