How Can I Do Business ? It`s Easy | मी व्यवसाय कसा करू शकतो ?

How Can I Do Business ? It`s Easy | मी व्यवसाय कसा करू शकतो ?

How Can I Do Business ? | मी व्यवसाय कसा करू शकतो ?How Can I Do Business ? | मी व्यवसाय कसा करू शकतो ? 

प्रत्येक महत्त्वाकांक्षी व्यक्तीला आपला एखादा स्वताःचा व्यवसाय असावा असे वाटत असते How Can I Do Business ? त्या सर्वाना हा प्रश्न नक्कीच पडत असेल .सगळेच लोक व्यवसाय करतात असे नाही , आजच्या ह्या लेखामध्ये आपण व्यवसाय कसा करावा. कोणता करावा आणि  व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक गोष्ठी काय आहेत ते पाहूया ज्यांना आपण नोकरीपेक्षा  काहीतरी वेगळे करावे असे वाटत असते असेच लोक Business  कडे वळतात.  How Can I Do Business ?  ह्या प्रश्नाचे उत्तर आपण सविस्तर पाहूयात, व्यवसाय करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवशकता असते ते आपण पाहूयात.

व्यवसाय करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणे आवश्यक आहे ,आणि तशी आपली इच्छाशक्ती हवी आहे. व्यवसाय सुरु करताना खूप अडचणी येत असतात.येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढून व्यवसाय उभा करावा लागतो. व्यवसाय सुरु केल्या  नंतरही वेळोवेळी अडचणींचा सामना करावा लागतो , त्यावेळी आपली इच्छाशक्ती उपयोगी येते. व्यवसाय वाढीला मर्यादा नसतात.

व्यवसाय कसा निवडावा

आज आपण पाहतो सगळ्या व्यवसायात स्पर्धा खूप वाढलेली आहे .आपण ठरवतो कि आपण एखादा व्यवसाय करू या  पण कोणता  व्यवसाय  करायचा  हे कळत नाही. त्यासाठी आपण काही गोष्टीचा अभ्यास करूया

लघु उद्योग ,मध्यम उद्योग, मोठे उद्योग. आपल्याला कुठल्या प्रकारातील उद्योग करायचा आहे हे ठरवावे कारण उद्योग व्यवसायामध्ये दिशा महत्वाची आहे.

आपली आवड कशामध्ये आहे हे पाहणे महत्वाचे आहे ,ते म्हणतात ना आवड असेल तर सवड असते .कारण आपण आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम केल्यास आपण झोकून देऊन काम करतो .

आपल्याला कोणत्या एरियात व्यवसाय करायचा आहे ,इथे दोन विभाग  पडतील ग्रामीण भाग आणि शहरी भाग ,ह्या ठिकाणी ग्रामीण भाग आणि शहरी भाग या मधील लोकांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असू शकतात,

उदाहरणार्थ – शहरी भागामध्ये फास्टफूड  ज्यास्त चालते ,फास्ट फूड ला ग्रामीण भागामध्ये ज्यास्त मागणी नसणार आहे , तिथे  मर्यादित वर्दळ असते आपण ज्या एरिया  मध्ये व्यवसाय  करणार आहोत त्या एरिया  मध्ये कोणत्या गोष्टीला ज्यास्त मागणी आहे ,तेथील लोकांचे राहणीमान कसे आहे हे सुद्धा पाहावे लागेल .

समजा आपल्याला सेवा उद्योग  करायचा आहे .तर आपण तेथील लोकांना काय सर्विस देऊ शकतो याचा अभ्यास करावा लागेल, त्या एरिया मध्ये कोणत्या सर्विस ची कमी आहे हे शोधावे लागेल , लोकांचे राहणीमान, तेथील भागोलिक विकास ,इतर पायाभूत सुविधा या सर्वांचा अभ्यास करून व्यवसाय निवडावा लागेल

व्यवसायासाठी भांडवल 

How Can I Do Business ? It`s Easy

 

व्यवसाय म्हंटले कि भांडवल हे आलेच ,बरेच लोक हे भांडवल नाही म्हणून व्यवसाय करण्यापासून लांब राहतात स्वतःचे  भांडवल असेल तर खूपच चांगले ,नसेल तर आपण कर्ज घेऊन व्यवसाय सुरु करू शकतो.

केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी उद्योग – व्यवसायासाठी योजना तयार केल्या आहेत आपण त्याचा लाभ घेऊन व्यवसाय सुरु करू शकतो. How Can I Do Business ?
ह्या योजनांची सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या ह्या संकेतस्थळावर सरकारी योजना ह्या सदरामध्ये मिळेल. Sarkari Yojna In Marathi

भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या सारख्या खासगी संस्था सुद्धा उद्योग सुरु करण्यासाठी मदत करतात.अधिक माहिती साठी सोबत दिलेल्या संकेतस्थळास भेट दया   https://byst.org.in

आपल्याला जेवढ्या भांडवलाची गरज आहे तेवढेच कर्ज घेणे चांगले, अवांतर खर्चाला बंधन घालणे हे आपल्या फायद्याचे असते ,कधी कधी आपण मोठेपणा करण्यामध्ये अवांतर खर्च करून बसतो व नंतर याचा पश्चाताप होतो

व्यवसायामध्ये आपण टप्याटप्याणे  गुंतवणूक करू शकतो ,जसे कि अत्यावश्यक गोष्टीसाठी ,नंतर घेतल्या तरी चालतील अश्या गोष्टी, हॉटेल /दुकान यांच्या सेटअप साठी टप्याटप्याणे गुंतवणूक करू शकतो.

आपण आपला मित्र परिवार , किवां नातेवाईक  त्यांना प्रत्येक महिन्याला विशिष्ट रक्कम परत दयायचे कबूल करून  यांच्याकडून सुद्धा पैसे घेऊन भांडवल उभे करून व्यवसाय सुरु करू शकतो .

  व्यवसायासाठी लागणारे आवश्यक परवानेकुठलाही व्यवसाय म्हंटला कि त्याला त्या व्यवसाय अनुषंगाने जे काही शासनाचे परवाने असतील ते काढून घेतले पाहिजेत. शॉपॲक्ट लायसन्स,  हॉटेल साठी फूड लायसन्स, वाहन परवाने इत्यादी

जे आपल्या व्यवसायाशी संबधित परवाने आहेत ते काढून घेतले पाहिजेत व वेळच्या वेळी अपडेट केले पाहिजेत.

व्यवसायाची मांडणी 

ज्यांची दुकाने ,हॉटेल ,बैठे व्यवसाय आहेत अशा व्यवसायासाठी मांडणी खूप महत्वाची असते , आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण दुकान कसे आहे याचा अंदाज लाऊन त्या दुकानात जातो .

बरेच लोक बाजारातुन फिरतांना वस्तू बघत जात असतात , लोकांना वस्तू दिसतील अश्या ठेवल्या पाहिजेत ,तुम्ही मारवाडी लोकांची दुकाने पाहिली असतील किराणा मालाचे दुकान पहा  त्यांच्याकडे सर्व वस्तू  ठेवलेल्या असतात.

हॉटेल सुद्धा आपण बाहेरून बघून अंदाज लावत असतो कि हॉटेल आतमध्ये कसे असेल,आपण जे लोकांना दाखवतो लोकांना दिसत असते. 

व्यवसायाचे मार्केटिंग – How Can I Do Business ? 

व्यवसायामध्ये मार्केटिंग खूप महत्वाचे आहे , मार्केटिंग चे विविध पर्याय उपलब्ध आहेत ,सोशल मिडिया आहे त्यावर बरेच  पर्याय उपलब्ध आहेत,  त्यावर  तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात सहज पणे करू शकता ,

तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे, तुम्ही स्थानिक वर्तमान पत्रात प्याम्प्लेट टाकून लोकांपर्यंत पोहचू  शकता.

तुमचा व्यवसाय मोठा असेल आणि  तुमची पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सुद्धा नेमू शकता.तुम्ही वेगवेगळ्या ऑफर देऊन लोकांना आकर्षित करू शकता .तुम्हाला रोज नव्याने  नवीन लोकांपर्यंत पोहचता आले पाहिजे.

व्यवसाय करत असताना खूप गोष्टीना सामोरे जावे लागत असते .नवीन व्यवसायामध्ये संयम, जिद्द ,चिकाटी हे गुण अंगीकारले पाहिजेत. तरच आपण व्यवसायात टिकून राहू शकतो ,

जी व्यक्ती एक हजार दिवस व्यवसायात तग धरून असते, ती व्यक्ती व्यवसाय कधी सोडत नाही ,व्यवसाय म्हंटल कि चढ उतार आलेच , बरेच लोक व्यवसाय चालू करतात ५/६  महिने व्यवसाय नाही चालला कि बंद करून टाकतात.

व्यवसाय  बंद करण्याऐवजी तो का चालत नाही ,याची कारणे शोधून त्यावर काम केले पाहिजे, आपण कुठे चुकत आहोत हे शोधले पाहिजे.त्या व्यवसायातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले पाहिजे,

Conclusion

आपला स्वताचा व्यवसाय असावा प्रत्येकाला वाटत असते पण  How Can I Do Business ? हा प्रश्न मनात येतोच आणि ह्या प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला येथे मिळाले आहे चला तर मग व्यवसाय करू यात 

  एवढ्या मोठ्या जगात सगळे काही विकले जाते.व्यवसायात झोकून देऊन काम केले तर तुमचा व्यवसाय यशस्वी झालाच समजा व्यवसाय हा निरंतर चालणारी गोष्ट आहे ,

आपण पाहतो काही उद्योग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झालेले असतात .व्यवसाय कधी थांबत नाही.

आम्ही आशा करतो हे मार्गदर्शन आपणास उपयोगी पडेल. आपण आमच्या संकेतस्थळास  भेट दिल्याबद्दल धन्यवाद

खाली दिलेल्या संकेतस्थळा ला भेट देऊन आपण आपले कर्ज प्रकरण दाखल करू शकता.

www.pmeqp.in

www.kvic.org.in

 https://www.mudra.org.in

https://maha-emegp.gov.in 

Read more