सोलर एनर्जी म्हणजे काय सोलर एनर्जी वापराचे फायदे कोणते आहेत Solar Energy best Information in Marathi | सोलर एनर्जी वापरा आणि वीजबिलापासून मुक्ती मिळवा ह्या लेखा मध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सोलर एनर्जी म्हणजे सूर्या पासून प्राप्त झालेली उर्जा. सूर्याची किरणे एका बिंदूवर एकत्रित करून त्यापासून उर्जा निर्माण केली जाते ,सोलर एनर्जी म्हणजे सौर उर्जेचे विजे मध्ये रुपांतर करणे होय. सौर उर्जेचा वापर विविध प्रकारे केला जातो सौर पॅनल वीज उत्पादन करण्यासाठी वापरले जाते सोलर वॉटर हीटर पाणी गरम करण्यासाठी वापरतात ,सोलर कुकर चा वापर अन्न शिजवण्यासाठी केला जातो इत्यादी गोष्टी साठी सोलर एनर्जी वापरतात.मोठ मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा सोलर एनर्जी चा वापर कर्ला जातो.
Solar Energy best Information in Marathi | सोलर एनर्जी वापरा आणि वीजबिलापासून मुक्ती मिळवा
भारत देश वीज निर्मिती मध्ये अग्रेसर असा देश आहे भारताचा वीज निर्मिती मध्ये जगात सहावा क्रमांक लागतो. वीज निर्मिती मध्ये वापरला जाणाऱ्या कोळश्याचा साठा कमी होत चालला आहे. भविष्यकालीन विचार केला तर आपल्याला कोळश्याच्या टंचाई बरोबर विजेच्या टंचाई चा सामना करावा लागणार आहे .सोलर एनर्जी हा आपल्या समोर एक चांगला पर्याय उपलब्ध आहे .सोलर एनर्जी वापरून आपण भविष्यात उद्भभवनाऱ्या वीज टंचाई चा प्रश्न मार्गी लाऊ शकतो .
भारत हा एक उष्णकटिबंधीय देश आहे आपल्याकडे साधारणता 300 दिवस पुरेसा सूर्यप्रकाश असतो, सूर्य प्रकाश मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपण चांगल्या प्रमाणात सोलर एनर्जी चा उपयोग करू शकतो .जेव्हा सूर्य प्रकाश पृथ्वीवर येतो आणि तो सोलर पॅनल वर पडल्यानंतर सोलर पॅनल द्वारे विद्युत उर्जा निर्माण केली जाते तयार झालेली विद्युत ऊर्जा बॅटरी मध्ये साठवून वीज पुरवठ्यासाठी वापरली जाते.
आपण जेव्हा आपल्या घरासाठी सोलर एनर्जी द्वारे वीज निर्मिती करतो त्यासाठी कोणती साधने वापरली जातात, किती खर्च येतो सोलर एनर्जी वापरणे आपल्यासाठी फायद्याचे आहे का याची आपण Solar Energy best Information in Marathi | सोलर एनर्जी वापरा आणि वीजबिलापासून मुक्ती मिळवा ह्या लेखात माहिती घेऊया हा लेख पूर्ण वाचा आणि सोलर एनर्जी बद्दल माहिती जाणून घ्या
Types of Solar Panels ( सोलर पॅनल चे प्रकार )
- Monocrystalline solar panels
- Polycrystalline solar panels
- Passivated Emitter and Rear Contact cells (PERC) solar panels
- Thin-film solar panels
घरासाठी किती किलोवॅट चा सोलर प्लांट योग्य आहे ?
Solar Energy best Information in Marathi | सोलर एनर्जी वापरा आणि वीजबिलापासून मुक्ती मिळवा
तुमच्या घरासाठी किती किलोवॅट चा सोलर पॅनल लागेल हे तुमचा विजेचा वापर किती आहे ह्यावर अवलंबून आहे .तुमचे महिन्याचे वीज बिल 1000 रुपये असेल तर तुम्हाला 1 किलोवॅट चा सोलर प्लांट तुमच्यासाठी योग्य आहे . 5000 रुपये विजेचे बिल असेल तर 5 किलोवॅट चा सोलर प्लांट योग्य आहे
10 किलोवॅट चा सोलर प्लांटमध्ये प्रत्येक दिवसाला 40 युनिट विजेची ची निर्मिती होते म्हणजे महिन्याला 1200 युनिट विजेची निर्मिती होते .यावरून तुम्ही ठरवू शकता तुमच्या साठी किती किलोवॅट चा सोलर प्लांट योग्य आहे. सोलर प्लांट मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत ऑनग्रीड आणि ऑफग्रीड हे दोन प्रकार आहेत.
ऑनग्रीड प्रणाली
ऑनग्रीड प्रणाली हि बॅटरी विरहित प्रणाली आहे .त्यामुळे ह्या प्रणाली मध्ये बॅकअप ची सुविधा नाही यामध्ये सूर्यकिरणांपासून वीज निर्माण केली जाते.अतिरिक्त वीज ग्रीड ला विकण्याची सोय ह्या प्रणाली मधून उपलब्द करून दिली जाते. 1 किलोवॅट ऑनग्रीड सोलर सिस्टीम बसविण्यासाठी साधारणपणे 50-60 हजार रुपयापर्यंत खर्च येतो.
ऑफग्रीड प्रणाली
ऑफग्रीड प्रणाली मध्ये इन्वर्टर प्रमाणे बॅकअप मिळतो.हि सिस्टीम घरासाठी फायदेशीर आहे. 1 किलोवॅट ऑफग्रीड सोलर सिस्टीम बसविण्यासाठी साधारणपणे 65-75 हजार रुपयापर्यंत खर्च येतो.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सौर कृषी पंप योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे .ह्या योजनेंतर्गत मोठ्या आणि छोट्या शेतकऱ्यांना 3 HP आणि 5HP चे सोलर पंप वितरीत करणार आहे .ह्या योजने मध्ये राज्य सरकारकडून ९५% अनुदान मिळणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याने ५% रक्कम भरावयाची आहे.
योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासठी सोबत दिलेल्या संकेतस्थळास भेट दया https://www.mahadiscom.in/
सोलर रूफटॉप योजना
सध्या देशात विजेचे संकट पाहायला मिळत आहे .वीज प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा जाणवत आहे आणि वीज खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि उन्हाळ्यामध्ये वीज खंडित झाल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढत आहेत उन्हाळ्यात येणाऱ्या वीजबिलामुळे अनेक लोक त्रस्त असतात. अश्या वेळेस सौर उर्जेच्या पर्यायाचा आपण विचार करू शकतो .सोलर एनर्जी चा वापर करून आपण वीजबिला पासून मुक्ती मिळऊ शकतो. तुमचा खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला सरकार सुद्धा मदत करण्यास तयार आहे.
भारतात सौर उर्जेला चालना देण्यासाठी सोलर रूफटॉप योजना सुरु केली आहे. घरावर रूफटॉप सोलर सिस्टीम बसविण्यासाठी सरकार सबसिडी देते. तुम्ही 3 किलोवॅटपर्यंत ची सोलर सिस्टीम बसवणार आहात तर तुम्हाला 40% सबसिडी सरकारकडून मिळते आणि 10 किलोवॅटपर्यंत सोलर सिस्टीम बसवली तर सरकारकडून 20% सबसिडी मिळते.
सोलर पॅनल चा कालावधी 25 वर्ष आहे ,एकदा गुंतवणूक करून तुम्ही दीर्घ कालावधी साठी वीज बिलापासून मुक्ती मिळऊ शकता.
सबसिडीसाठी अर्ज कसा करावा ?
तुम्हाला सोलर रूफटॉप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही https://solarrooftop.gov.in/
या संकेतस्थळास भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता .ह्या वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुमच्या राज्याचा पर्याय निवडून त्यावर क्लिक करा व पुढे ऑनलाइन अर्ज चा पर्याय निवडून त्यावर क्लिक करून तुमच्या अर्जा मध्ये योग्य ती माहिती भरून आवश्यक कागदपत्रे उपलोड करावी लागतील .अर्ज पूर्ण भरून झाल्यावर सबमिट वर क्लिक करा अश्या पद्धतीने तुम्ही ऑनलाइन अर्ज भरून या योजने मध्ये सहभागी होऊ शकता.
Conclusion
Solar Energy best Information in Marathi | सोलर एनर्जी वापरा आणि वीजबिलापासून मुक्ती मिळवा ह्या लेखा मध्ये आपण Solar Energy बद्दल संपूर्ण माहिती घेतली. सोलर एनर्जी वापरून आपण वीजबिलापासून मुक्ती मिळऊ शकतो .सरकार सुद्धा सोलर एनर्जी वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहे .आपण सुद्धा सोलर एनर्जी चा वापर सुरु करून पर्यावरणाचा समतोल राखूया .आपण आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबदल धन्यवाद .
FAQ
1. घरावर रूफटॉप सोलर सिस्टीम बसविण्यासाठी सरकार सबसिडी देते का ?
घरावर रूफटॉप सोलर सिस्टीम बसविण्यासाठी सरकार सबसिडी देते 3 kw सिस्टीम साठी 40% सबसिडी आणि10 kw साठी 20 % सबसिडी सरकारकडून मिळते.
2. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने साठी सरकारकडून किती अनुदान मिळते ?
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी राज्य सरकारकडून ९५ % अनुदान मिळते , आणि शेतकऱ्याने ५% रक्कम भरावयाची आहे.
3. सोलर एनर्जी वापरा आणि वीजबिलापासून मुक्ती मिळवा हे शक्य आहे का ?
Solar Energy best Information in Marathi | सोलर एनर्जी वापरा आणि वीजबिलापासून मुक्ती मिळवा हा लेख पूर्ण वाचा .तुम्ही सोलर एनर्जी वापरून खात्रीशीर वीजबिलापासून मुक्ती मिळऊ शकता.
1 thought on “Solar Energy best Information in Marathi | सोलर एनर्जी वापरा आणि वीजबिलापासून मुक्ती मिळवा”