Sanjay Gandhi Niradhar Pension Yojna हि योजना समाजातील विविध घटकांसाठी त्यांना त्यांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी राज्य केंद्र सरकार व राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवीत असते
आज आपण ह्या लेखा मध्ये निराधार लोकांसाठीची संजय गांधी निराधार योजना व वृद्ध व्यक्तींसाठी असलेली श्रावणबाळ योजनांची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
Sanjay Gandhi Niradhar Pension Yojna हि एक राज्य पुरस्कृत योजना आहे. राज्यातील अपंग,मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती ,वृद्ध व्यक्ती ,अंध ,घटस्फोटीत महिला, विधवा , वेश्याव्यवसाय पासून मुक्त केलेल्या महिला यांना अर्थसाहाय देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार पेन्शन योजना १९८० साला पासून राबविण्यात येत आहे.
या योजने अंतर्गत ६५ वर्षाखालील निराधार लोकांना मदत दिली जाते.
योजनेचे लाभाचे स्वरूप
- लाभार्त्यास दरमहा 1500 रुपये देण्यात येतात.
- एकाच कुटुंबात एका पेक्षा ज्यास्त लाभार्थी असल्यास कुटुंबाला ९०० रुपये प्रतिमाह देण्यात येतात.
Sanjay Gandhi Niradhar Pension Yojna – योजनेचे लाभार्थी कोण ?
- ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला
- मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती
- वृद्ध व्यक्ती
- अपंगातील सर्व प्रवर्ग
- घटस्फोटीत महिला
- वेश्याव्यवसाय पासून मुक्त केलेल्या महिला
- तृतीयपंथी
- 35 वर्षावरील अविवाहित स्री
- देवदासी
- दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती
- अंध
Sanjay Gandhi Niradhar Pension Yojna- पात्रतेचे निकष
- अर्जदार किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय ६५ वर्षापेक्षा कमी असावे
- कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी २१०००/- पर्यंत असावे
- आर्थिक सहाय्य एक व्यक्ती निराधार कुटुंबाला रुपये ६००/- प्रतिमाह आणि एकापेक्षा ज्यास्त लाभार्ती निराधार कुटुंबाला रुपये ९०० /- प्रतिमाह या मर्यादेत.
Sanjay Gandhi Niradhar Pension Yojna- अर्ज करण्याची प्रक्रिया
विहित नमुन्यातील अर्ज भरून त्या सोबत आवश्यक ( खाली दिलेली आहेत ) कागद पत्रे जोडून
वयाचा दाखला – ग्रामपंचायतीच्या / नगरपालिका /महानगरपालिका यांच्या कडील जन्म नोंद उताऱ्याची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला
तृतीयपंथी असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक व समाज कल्याण विभागाचा दाखला द्यावा लागतो.
घटस्फोटीत महिलांना घटस्फोटाबाबतची न्यायालयीन कागदपत्रे जोडावी लागतात विधवांनी पतीचे मुख्य दाखला सादर करावा लागतो.
अपंग असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील.
अनाथ असल्याचा दाखला ग्रामसेवक यांनी दिलेला व गटविकास अधिकारी व प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी साक्षांकित केलेला दाखला
अर्जदारणे तर कोणतेही सरकारी योजनेचा लाभ न घेतल्याचा गाव कारभार तलाठ्याचा दाखला जोडावा लागतो
सदर विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून हा गावकामगार तलाठी /तहसीलदार यांच्याकडे द्यायचा आहे.
Sanjay Gandhi Niradhar Pension Yojna अधिक माहिती साठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडे संपर्क करावा .https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ६५ वर्षें वय ओलांडलेल्या वृद्धांना आर्थिक सहाय्य करणे .या पेन्शन योजनेंतर्गत राज्यातील वृद्धांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र्य करून त्यांना उदर निर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून दरमहा ६००/- रुपये दिले जात्तात
या योजनेमध्ये दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील लाभार्थ्यासाठी वेगवेगळ्या अटी व नियम आहेत.
श्रावण बाळ योजनेसाठी पात्रता निकष
वर्ग अ
- दारिद्रयरेषेखालील लाभार्थी यांना दरमहा ४००/- रुपये निवृत्तीवेतन दिले जाते आणि लाभार्थ्यांना केंद्र सरकार मार्फत इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतनयोजनेतूनहि दरमहा २००/- रुपये दिले जातात
- अर्जदाराचे वय ६५ वर्ष किवा अधिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हे महाराष्ट्रातील कायमचे रहिवासी असले पाहिजेत
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २१०००/- रुपयांपेक्षा कमी असल्याबाबत तहसीलदारांचा दाखला
- दारिद्रय रेषेखाली असल्या बाबतचा साक्षांकित पुरावा.
- विहित नमुन्यातील अर्ज गावकामगार तलाठी यांच्याकडे द्यायचा असतो.
वर्ग ब
- अर्जदाराचे वय ६५ वर्ष किवा अधिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हे महाराष्ट्रातील कायमचे रहिवासी असले पाहिजेत.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २१०००/- रुपयांपेक्षा कमी असल्याबाबत तहसीलदारांचा दाखला
- विहित नमुन्यातील अर्ज गावकामगार तलाठी यांच्याकडे द्यायचा असतो.
शासनाच्या इतर कोणत्याही योजनेंतर्गत नियमितपणे मासिक लाभ घेत असणारी व्यक्ती श्रावणबाळ सेवा राज्य
निवृत्तीवेतन योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र नाही.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागद कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- रहिवासी दाखला- किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे .त्याकरता पुरावा कागदपत्रे ग्रामसेवक /तलाठी/ मंडळ निरीक्षक यांचा यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला.
- वय वर्ष ६५ आहे त्याकरता पुरावा म्हणून जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला /आधार कार्ड
ह्या लेखामध्ये आपण Sanjay Gandhi Niradhar Pension Yojna आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना. ह्या योजनांची सविस्तर माहिती घेतली आहे ह्या योजनांचा लाभ घेऊन आपण आपले जीवन सुसह्य करावे