MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Maharashtra – 2024 या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरीब लोकांवर उपचार करणे असा आहे . MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Maharashtra – 2024 ह्या लेखा मध्ये आज आपण MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना ह्या दोन योजनांची एकत्रितपणे माहिती घेणार आहोत .राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे आहे. गरीब लोकांसाठी शस्रक्रिया ,प्रत्यारोपण थेरपी सारख्या महागड्या आरोग्य सेवा सुद्धा या योजनेंतर्गत पुरवल्या जाणार आहेत.
खासगी आणि शासकीय रुग्णालया मार्फत ह्या योजनेचा लाभ दिला जातो .युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमाकंपनी मार्फत विमा संरक्षण विमा तत्वावर पुरविले जाते.
योजनेचे लाभार्थी – MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Maharashtra – 2024
अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून वितरीत करण्यात आलेली पिवळी शिधापत्रिका धारक ,केशरी शिधापत्रिका धारक व अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका धारक कुटुंबे
शासकीय अनाथआश्रमातील मुले ,शासकीय आश्रम शाळा ,शासकीय महिला आश्रमातील महिला ,शासकीय वृद्ध आश्रमातील जेष्ठ नागरिक ,बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत नोदणी झालेले जीवित कामगार व त्यांची कुटुंबे .
नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असलेले शेतकरी कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
शहरी भागातील लाभार्थ्यांचा तपशील- MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Maharashtra – 2024
- कचरा वेचक
- भिक्षुक
- घरगुती कामगार
- गटई कामगार/ मोची/फेरीवाले/रस्त्यावर सेवा पुरविणारे अन्य कामगार
- बांधकाम कामगार/ प्लंबर/ गवंडी/कामगार/ रंगारी/ वेल्डर/सुरक्षा रक्षक/हमाल व डोक्याने भार वाहणारे अन्य कामगार
- सफाईगार/स्वच्छक/ माळी
- घरकाम करणारे/ हस्तकला कारागीर/शिंपी,
- वाहतूक कर्मचारी/ चालक/ वाहक/ चालक व वाहकांचे मदतनीस/हातगाडी ओढणारे/सायकल रिक्षा ओढणारे
- दुकानात काम करणारे/ सहाय्यक/ लहान आस्थापनांमधील शिपाई/ मदतनीस/ अटेण्डट/ वेटर
- वीजतंत्री/ मेकॅनिक/ असेम्ब्ली / दुरुस्ती करणारे
- धोबी व वॉचमन
- ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचा तपशील
ग्रामीण भागाच्या एकूण वंचित निकषांपैकी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये खालील सहा वंचित निकषातील (1 to 6 ) किमान एक निकषात बसणाऱ्या कुटुंबांचा व आपोआप समाविष्ट (बेघर, भिक्षुक, स्वच्छता कर्मी, निराधार कुटुंबे, मुलत: अनुसूचित जमाती व कायदेशीर बंधपत्रित कामगार) निकषांतील कुटुंबांचा समावेश होतो.
- कच्च्या भिंती व कच्च्या छताच्या एका खोलीत राहणारे कुटुंब
- 16-59 वयोगटातील प्रौढ सदस्य नसलेले कुटुंबे
- 16-59 वयोगटातील प्रौढ पुरुष सदस्य नसलेले कुटुंब
- दिव्यांग कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे
- अनुसूचित जाती व जमाती मधील कुटुंबे
- भूमिहीन मजूराची कुटुंबे
लाभार्थी पात्रता
योजने अंतर्गत विमा संरक्षण- MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Maharashtra – 2024
- वार्षिक आरोग्य संरक्षण मर्यादा रुपये १.५० लाखावरून रुपये ५ लाख पर्यंत
- मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्रक्रियेकरिता रुपये २.५० लाखा वरून ४.५० लाख इतकी वाढ
- विविध प्रकारचे १३५६ उपचरांसाठी सर्व लाभार्थी पात्र
- ह्या योजनेंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांची संख्या १३५० इतकी आहे
- रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींसाठी १८४ विविध उपचारांसाठी रुपये १ लाख मर्यादा
- या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाला किवा सर्व सदस्यांना घेता येतो याची मर्यादा वार्षिक ५ लाख रुपये इतकी आहे.
- पॉलिसि वर्ष हे १ एप्रिल ते ३१ मार्च असे राहील
योजने अंतर्गत कोणते उपचार समाविष्ट आहेत
- जळीत
- ह्दयरोग
- ह्दयरोग शस्त्रक्रिया व उपचार
- आकस्मिक सेवा
- त्वचारोग
- अंत:स्त्राव संस्थेचे विकार
- कान, नाक व घसा रोग
- सर्वसाधारण औषधशास्त्र चिकित्सा
- सर्वसाधारण शस्त्रक्रिया
- व्याधी चिकित्सा
- संर्सगजन्य आजार
- इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजी
- जठरांत्रमार्गाचे रोग
- कर्करोगावरील औषधोपचार
- नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
- मुत्रपिंड विकार
- मज्जातंतूचे विकार
- मज्जातंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया
- स्त्री रोग व प्रसुती शास्त्र
- नेत्ररोग शस्त्रक्रिया
- अस्थिव्यंग शस्त्रक्रिया
- बालरोग शस्त्रक्रिया
- बालरोग कर्करोग
- प्लास्टीक सर्जरी
- आस्कमिक वैद्यकीय उपचार
- कृत्रिम अवयव उपचार
- फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार
- किरणोत्सर्गाव्दारे कर्करोग चिकित्सा
- संधिवात सबंधी उपचार
- जठर व आंत्र विकाराच्या शस्त्रक्रिया
- कर्करोगाच्या शस्त्रक्रिया
- मुत्रवह संस्थेच्या विकारांवरील शस्त्रक्रिया
- मानसिक आजार
- जबडा व चेहऱ्याच्या अस्थींवरील शस्त्रक्रिया
योजने अंतर्गत समाविष्ट रुग्णालये
या योजने अंतर्गत शासकीय व खासगी रुग्णालयांचा समावेश आहे ,शासकीय रुग्णालयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग ,महानगरपालिका ,नगरपालिका यांच्या अखत्यारीतील रुग्णालयांचा समावेश आहे .सर्व मिळून रुग्णालय संख्या १३५० इतकी आहे.
आरोग्यमित्र
MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Maharashtra – 2024 ह्या योजनेंतर्गत
अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णांची नोदणी ,उपचारा दरम्यान सहाय्यक तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती केली आहे प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र उपलब्ध असणार आहेत.
आरोग्य शिबीर- MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Maharashtra – 2023
योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांना घेता यावा व या योजनेची माहिती व्हावी ,यासाठी अंगीकृत रुग्णालयांमार्फत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात.
या शिबिरात रुग्णांची तपासणी करून दिली जाते व तसेच रुग्ण १३५६ उपचारांपैकी सदर रुग्ण पात्र झाल्यास त्यावर या योजने अंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार केले जातात.
MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Maharashtra – 2024 ह्या लेखा आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना ह्या योजनांची माहिती घेतली आहे सोबत दिलेल्या संकेतस्थळास भेट देऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता https://www.jeevandayee.gov.in/index.jsp
आयुष्यमान भारत कार्ड डाऊनलोड करा – https://ayushmanbharat.mp.gov.in/
FAQ
प्रश्न -1 MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कोणते उपचार समाविष्ट आहेत ?
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पुढील उपचार समाविष्ट आहेत – जळीत,ह्दयरोग ,ह्दयरोग शस्त्रक्रिया व उपचार,आकस्मिक सेवा, त्वचारोग ,अंत:स्त्राव संस्थेचे विकार,कान नाक व घसा रोग सर्वसाधारण,औषधशास्त्र चिकित्सा सर्वसाधारण शस्त्रक्रिया, व्याधी चिकित्सा ,संर्सगजन्य आजार, इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजी जठरांत्रमार्गाचे रोग ,कर्करोगावरील औषधोपचार, मूत्रपिंड विकार , मज्जातंतू चे विकार ,स्री रोग व प्रसूती शास्र ,नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन , मज्जातंतूच्या विकारावरील शस्र्क्रिया, नेत्ररोग शस्रक्रिया ,अस्थिव्यंग शस्रक्रिया, बालरोग शस्रक्रिया, मानसिक आजार इत्यादी उपचार समाविष्ट आहेत
प्रश्न -2 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत वार्षिक आरोग्य संरक्षण मर्यादा किती रुपये आहे ?
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत वार्षिक आरोग्य संरक्षण मर्यादा ५ लाख रुपये इतकी आहे.
प्रश्न -3 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट रुग्णालय संख्या किती आहे ?
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालय संख्या १३५० इतकी आहे .
1 thought on “MJPJAY : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Maharashtra – 2024”