Government Subsidy Business Loan Schemes -2024 | सरकारी व्यवसाय कर्ज योजना ह्या लेखा मध्ये आज आपण अशाच
Sarkari Yojna यांची माहिती घेणार आहोत. आपण केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी वेळोवेळी समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. या योजना राबविणे मागचा उद्देश समाजातील विविध घटकांचे जीवनमान सुधारण्यासाठी होत आहे.
बऱ्याच लोकांना या योजनांची नावे माहीत असतात पण ह्या योजनांचे फायदे, अर्ज कुठे करायचा, इत्यादी माहिती नसते, इथे तुम्हाला Sarkari yojna 2024 ची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)
Government Subsidy Loan for Business | सरकारी योजना-2024 ह्या लेखा मध्ये आज आपण पंतप्रधान रोजगार निर्मिती कर्यक्रम ( PMEGP ) ह्या योजनेची माहिती घेऊयात . केंद्र शासनाने पंतप्रधान आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना या दोन योजना एकत्रित करून PMEGP ही योजना सुरू केली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त तरुण-तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा व स्वयंरोजगारास प्रोत्साहन मिळावे हा आहे . या योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो
जिल्हा उद्योग केंद्र , खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्यामार्फत आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
योजनेची वैशिष्ट्ये- Government Subsidy Business Loan Schemes -2024
सर्वसाधारण गटासाठी लाभार्थ्याचे भांडवल हे १0 % असले पाहिजे.आणि त्यास अनुदान शहरी भागासाठी १५ % आणि ग्रामीण भागासाठी २५ % असे आहे.
अनु जाती / जमाती व इतर मागासवर्गीय जाती / माजी सैनिक / अपंग / महिला या गटासाठी लाभार्थ्याचे भांडवल हे पाच टक्के असले पाहिजे आणि त्यास अनुदान शहरी भागासाठी २५ % आणि ग्रामीण भागासाठी ३५ % असे आहे
योजनेची अंमलबजावणी
जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्राम उद्योग महामंडळ यांच्यामार्फत अर्ज स्वीकारले जातात. या अर्जाची योजनेचे निकषानुसार व सर्व योग्य ती कागदपत्रे यांची छाननी केल्यानंतर पात्र अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या जिल्हा कार्य बल समितीच्या शिफारशीने संबंधित बँकेकडे पाठवले जातात.
बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर लाभार्थ्यास कर्ज वितरित केले जाते प्रचलित व्याजदर याप्रमाणे बँक व्याजदर आकारते सदर कर्जाचा कालावधी तीन ते सात वर्षाचा असतो कर्ज मंजूर झाल्यावर लाभार्थी आणि संबंधित व्यवसायाचे उद्योजकीय प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे .
सदर योजनेत मिळणारे अनुदान बँक ( टर्म डिपॉझिट रिसीट ) म्हणून स्वतःकडे तीन वर्षाकरिता ठेवून घेते व तीन वर्षानंतर आपल्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करते
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
- लाभार्थ्याचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
- बचत गट, सहकारी सोसायटी, चॅरिटेबल ट्रस्ट ,वैयक्तिक लाभार्थी हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- अर्जदाराचे शिक्षण कमीत कमी आठवी पास असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसावेत
अर्थसहाय्य उपलब्धता- Government Subsidy Loan for Business | सरकारी योजना-2024
सदर योजनेअंतर्गत कर्ज प्रकरण ही सर्व जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँके मार्फत राबवली जातात.
बँकेला कर्ज मंजूर व नामंजूर करण्याचे अधिकार आहेत या योजनेअंतर्गत सेवा उद्योगाला कर्ज रक्कम रुपये १० लाख व उत्पादन प्रकल्पाला कर्ज रक्कम रुपये २५ लाख पर्यंतचे कर्ज चालू व्याजदराप्रमाणे वितरित केले जाते.
आरक्षण प्राधान्य
- अनुसूचित जाती प्रवर्ग करिता १५ %
- महिला लाभार्थ्यास 30%
- इतर मागासवर्गीय प्रवर्गास २७ %
- अनुसूचित जमाती करिता ७.५ %
- अपंग 3%
अर्ज कोठे व कसा करावा
Government Subsidy Business Loan Schemes -2024 | सरकारी व्यवसाय कर्ज योजना ह्या योजना केंद्र शासन पुरस्कृत असून राज्यात खादी ग्रामोद्योग महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्र येथे विहित नमुन्यात आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज करू शकतो किंवा ऑनलाइन अर्ज करू शकतो.
Government Subsidy Business Loan Schemes -2024 चा लाभ घेण्यासाठी
या संकेतस्थळाला भेट दया.
मुद्रा लोन योजना -Government Subsidy Business Loan Schemes -2024 | सरकारी व्यवसाय कर्ज योजना
ही योजना ज्या व्यक्तींना व्यवसाय करावयाचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. व्यवसायासाठी भांडवल हे लागतेच म्हणून केंद्र सरकारने वैधानिक कायद्याअंतर्गत मुद्रा बँक स्थापन केलेली आहे .Government Subsidy Business Loan Schemes -2024
हि योजना तीन वर्गवारी मध्ये विभागली आहे.
- शिशु कर्ज या कर्ज प्रकारच्या मुद्रा योजना अंतर्गत लाभार्थ्यांना रुपये पन्नास हजार कर्ज वाटप केले जाते.
- किशोर कर्ज या प्रकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत रुपये पन्नास हजार ते पाच लाख पर्यंतच्या कर्जाचे वाटप केले जाते.
- तरुण कर्ज या प्रकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रुपये पाच लाख ते दहा लाख पर्यंतचे कर्ज वाटप केले जाते.
मुद्रा योजनेचे लाभार्थी
दुकानदार, फळे / भाजीपाला विक्रेते, ट्रकचालक ,सर्विस सेक्टर, लघुउद्पादक, सेवा उद्योग हे सर्व ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महिला उद्योजकांसाठी
.
मुद्रा महिला उद्योजकांसाठी महिला योजना निधी नावाची विशेष योजना राबवली आहे.त्याद्वारे मदत पुरवली जाईल.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची व्याप्ती काय आहे आणि कोणत्या संस्था कर्ज देतील
सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका, खाजगी क्षेत्रातील बँका यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या माध्यमातून प्रधानमंत्री मुद्रा योजना उपलब्ध असेल.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे फायदे
देशातील कोणत्याही व्यक्तीला ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण आहे आणि त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ती व्यक्ती कर्ज घेऊ शकते . ह्या sarkari Yojna चा लाभ घेऊ शकतो.
कर्जदाराला मुद्रा कार्ड मिळते त्याच्या मदतीने व्यवसायाच्या गरजांवर खर्च करता येतो.
कोणतीही हमी न घेता कर्ज देण्यात येते कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढविता येतो.
मुद्रा लोन साठी आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- प्राप्तिकर रिटर्नचा पुरावा
- व्यवसाय आवश्यक लायसन्स नोंदणी प्रमाणपत्र
- आयकर व विक्रीकर विवरणपत्र मागील दोन वर्षाचे आर्थिक ताळेबंद
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- मालक भागीदार संचालक यांचे दोन फोटो
- उपलब्ध असल्यास मागील सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट
- अर्जदार कुठल्याही बँकेचा संस्थेचा कर्जदार नसावा.
- कायमचा पत्ता पत्त्याचा पुरावा हा म्हणून लाईट /बिल नळ बिल
वरील सर्व कागदपत्रे घेऊन आपणास आपल्या नजीकच्या बँकेत जावे लागेल. त्यांना तुमची सर्व माहिती सांगून कागदपत्रे दाखवून आपणास कोणत्या गटात कर्ज प्रकरण करायचे आहे हे कळवावे,
त्यानुसार बँक अधिकारी आपणास मार्गदर्शन करतील व ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगतील आपण खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या व आपला मुद्रा लोन योजनेसाठी Government Subsidy Business Loan Schemes -2024 चा लाभ घेऊन स्वताचा व्यवसाय सुरु करण्यासठी अर्ज भरा.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम- Government Subsidy Business Loan Schemes -2024 | सरकारी व्यवसाय कर्ज योजना
Chief Minister Employment Generation program or CMEGP
सदर योजनेमध्ये राज्य शासनाकडून एक ते पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
आपण आपला व्यवसाय उभारू शकतो.
ही योजना महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनाया तर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्र मार्फत राबवली जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
सदर योजनेअंतर्गत उत्पादन क्षेत्रातील उद्योगासाठी जास्तीत जास्त प्रकल्प मर्यादा 50 लाख असून सेवा क्षेत्रातील उद्योगासाठी जास्तीत जास्त प्रकल्प मर्यादा 50 लाख असेल
तुमचे वय ते १८ ते ४५ असणे गरजेचे आहे यामध्ये महिला माजी सैनिक यांना कमाल वयोमर्यादित पाच वर्षे सूट देण्यात आली आहे
शैक्षणिक पात्रता
प्रकल्प रुपये दहा ते पंचवीस लाखासाठी सातवी पास
प्रकल्प रुपये २५ ते ५० लाखांसाठी दहावी पास
योजनेचे निकष पुढीलप्रमाणे
- खेळते भांडवल जास्तीत जास्त 30 %
- इमारत बांधकाम जास्तीत जास्त 20%
- स्थिर भांडवल कमीत कमी ५० %
- अनुदान मर्यादा १५ ते ३५ % ( 30 % सर्व महिलांसाठी अनुदान राखीव 20% एससी एसटी साठी अनुदान राखीव )
- स्वगुंतवणूक पाच ते १० %
- इमारत बांधकाम जास्तीत जास्त 20%
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती पैकी असल्यास जात प्रमाणपत्र
- जन्मतारखेचा पुरावा ( जन्मतारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला )
- माजी सैनिक, अपंग यासारख्या विशेष प्रवर्गासाठी संबंधित प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
सदर योजना ही एक कुटुंब एक लाभार्थी ह्या तत्त्वावर राबवली जाते त्यामुळे या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला घेता येणार आहे.
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना – Government Subsidy Business Loan Schemes -2024 | सरकारी व्यवसाय कर्ज योजना
अति लहान उद्योगांना आर्थिक साह्य उपलब्ध करून त्यांचा विकास करणे व त्याद्वारे अधिक रोजगाराची संधी उपलब्ध करणे, स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणे यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना जिल्हास्तरीय जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र मार्फत राबवली जाते .
योजनेची वैशिष्ट्ये
सर्वसाधारण प्रवर्गासाठी 20 % मार्जिन मनी जास्तीत जास्त कमाल मर्यादा ४0,000 SC/ST लाभार्थीतीस ३५ % मार्जिन मनी कमाल मर्यादा ६0,000
व्याजाचा दर ४ % राहील
मार्जिन मनी कर्जाची परतफेड ठरवून दिलेल्या मुदतीत नाही केल्यास थकीत रकमेवर एक टक्का दंड व्याज आकारण्यात येईल
लाभार्थ्या ने स्वतःचे पाच टक्के भांडवल बँकेकडे जमा करणे आवश्यक आहे
पात्रता निकष
- शिक्षणाची व अट नाही
- चालू उद्योगाचा विस्तार करण्यासाठी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- उद्योग लघुउद्योग नोंदणीस पात्र असावा.
- कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये उद्योग सुरू करता येतो.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित SC/ ST उद्योजकांसाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजना. Government Subsidy Business Loan Schemes -2024 ह्या लेखातील SC /ST उद्योजकांसाठी विशेष योजना आहे
योजनेतील सवलती
समूह औद्योगिक विकास गट योजनेतील पायाभूत सुविधांसाठी १00% अर्थसहाय्य
प्रकल्पास उत्पन्न मर्यादा नाही
नाविन्यपूर्ण उद्योगास अतिरिक्त दहा टक्के प्रोत्साहन लागू
योजनेचा उद्देश
राज्यातील अनुसूचित जाती व जमाती मधील उद्योजकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे.
योजनेचे फायदे
या योजनेद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उद्योजकांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या लघु उद्योजकांसाठी असलेल्या औद्योगिक प्लॉट पैकी 20 टक्के प्लॉट हे सवलतीच्या दराने देण्याची तरतूद आहे या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उद्योजकांनी घेण्यास हरकत नाही या योजनेसाठी संबंधित जिल्हा उद्योग केंद्राकडे संपर्क साधावा
वरील सर्व योजनांची माहिती आपण Government Subsidy Business Loan Schemes -2024 | सरकारी व्यवसाय कर्ज योजना ह्या लेखा मध्ये घेतली आहे ह्या माहितीचा उपयोग करून आपण आपला स्वताचा व्यवसाय करण्यासाठी उपयोग करून घ्यावा.
आपण आमच्या संकेतस्थळास भेट दिल्याबद्दल धनयवाद .
1 thought on “Government Subsidy Business Loan Schemes -2024 | सरकारी व्यवसाय कर्ज योजना”