संकल्पना BIG BOSS मराठी 2024
BIG BOSS मराठी 2024 ही बिग ब्रदरवर आधारित रियालिटी टेलीवीजन कर्यक्रम BIG BOSS मराठी भाषेतील आवृत्ती,कलर्स मराठी वर दरवर्षी प्रसारित होते. BIG BOSS मराठी द्वारे महाराष्ट्रातील कलाकारांना स्वतः ला सादर करण्याची चांगली संधी आहे जोन डी मोल ज्युनियरने विकसित केलेल्या मूळ डच बिग ब्रदर फॉरमटवर आधारित आहे. बिग बॉस शो सात भाषांमध्ये आहे हिंदी ,कन्नड ,मराठी ,तेलगु ,तमिळ,बंगाली ,मल्ल्याळम या भाषांमध्ये आहे. प्रत्येक आठवड्यात,घरातील सदस्य त्यांच्या दोन सहकारी गृहस्थांना बेदखल करण्यासाठी नामनिर्देशीत करतात. शेवटी ,एक गृहस्थ सदनातून बाहेर काढल्यानंतर” निघून जाईल. शेवटच्या आठवड्यात,पाच गृहस्थ शिल्लक राहतील आणि प्रेक्षकांच्या मतानुसार विजेता ठरला जाईल .
BIG BOSS चे घर सुसज्ज आणि सजवलेले असते. यात आधुनिक सुविधांची श्रेणी आहे,परंतु घरात फक्त दोन बेडरूम,लिविंग एरिया ,किचन ,स्टोर रूम,स्मोकिंग रूम आणि चार टोयलेट्स बाथरूम आहेत.घरात बाग,पूल ,विश्रांती कक्ष ,वैद्यकीय कक्ष,सामान क्षेत्र,जेल आणि जिम आहे.घरात एक कन्फेशन रूम देखील आहे,जेथे बिग बॉसद्वारे घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारच्या संभाषणासाठी आणि नामाकन प्रक्रियेसाठी बोलवले जाऊ शकते.बिग बॉस मध्ये खेळण्यासाठी घराचे नियम पाळायला लागतात.नियम मोडल्यास शिक्षा होते.घरात टीव्ही कनेकशन नाही,टेलीफोन नसतो,घरातील सदस्यांना घरातील कामे करावी लागतात ,अर्थात कामे वाटून दिलेली असतात.
BIG BOSS या शो मध्ये कर्णधारपद असते. प्रत्येक आठवड्यासाठी एका कर्णधारची निवड विशिष्ट कार्याद्वारे केली जाते किवा घरातील सदस्यांद्वारे निवडले जाते. स्पर्धकांना दर आठवड्याला त्यांच्या घरातील सदस्यांकडून नामाकन दिले जाते, प्रेक्षक ज्या स्पर्धकांना बेदखल होण्यापासून वाचवू इच्छितात त्यांच्या बाजूने त्यांचे मत देतात.सर्वात कमी मते मिळवणाऱ्या स्पर्धकाला घरातून बाहेर काढले जाते. या शो मध्ये एका सदस्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री होते.
BIG BOSS ची मराठी भाषेतील आवृत्ती,जो कलर्स मराठीवर प्रसारित होतो. महेश मांजरेकर यांनी चार सीझनसाठी हा शो होस्ट केला होता आणि BIG BOSS मराठी 2024 चा पाचवा सीजन आहे तो रितेश देशमुखने यांनी होस्ट केला आहे. BIG BOSS चा आवाज रत्नाकर तारदाळकर यांचा आहे आहेत .बिग बॉस मराठी मध्ये १६ स्पर्धक आहेत. BIG BOSS हा शो 105 दिवस चालतो. BIG BOSS मराठीचा सेट गोरेगाव पूर्व, मुंबई येथे आहे.
BIG BOSS शो ची मराठी आवृत्ती आहे ,आणि पहिला सिझन वायाकॉम 18 च्या कलर्स मराठीवर प्रसारित झाला होता. या वर्षी BIG BOSS मराठी 2024 चा सीझन 5 आहे.
BIG BOSS सीजन 1-
BIG BOSS मराठी सीजन १ मध्ये १९ सदस्य होते.आरती सोलंकी,आस्ताद काळे ,अनिल थट्टे,भूषण कडू ,जुई गडकरी,मेघा धाडे,पुष्कर जोग ,राजेश श्रींगारपुरे,रेशम टिपणीस ,ऋतुजा धर्माधिकारी, सई लोकूर,स्मिता गोंदकर ,सुशांत शेलार,उषा नाडकर्णी ,विन्नीत भोंडे,शर्मिष्ठा राउत ,त्यागराज खाडिलकर ,नंदकिशोर चौगुले ,हर्षद्धा.
BIG BOSS सिझन १ चे विजेती पूजा धाडे होत्या आणि उपविजेत्या पुष्कर जोग होते.सीजन१ चे सादरीकरण महेश मांजरेकर यांनी केलेलं होत.बिग बोसच्या या सीजनसाठी लोणावळ्यात भव्य घराचा सेट बांधण्यात आला होता.२२ जुले २०१८ रोजी ग्रेंड फिनाले झालता.
BIG BOSS मराठी सीजन २
BIG BOSS मराठी २ हा भारतात प्रसारित होणाऱ्या BIG BOSS या शो चा मराठीचा दुसरा सीजन २६ मे २०१९ रोजी कलर्स मराठीवर आणि महेश मांजरेकर होस्ट म्हणून माझा बॉल,माझी बॅट ,माझा स्ट्म्प या टेगलाईनसह भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. बिग बॉस मराठीच्या घराची थीम रॉयल वाडा होती. वैशाली ,विद्याधर आणि अभिजित के यांच्याकडे कर्णधारपद होते. या सीजन पासून घरात अडगळीची खोली (जेल) करण्यात आले. १ सप्टेंबर २०१९ रोजी ग्रेंड फिनाले प्रसारित झाला आणि शिव ठाकरे विजेते आणि नेहा शितोळेला उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. बिग बॉस मराठी सीजन २ चे टीआरपी ०.5 मिळाला होता.
BIG BOSS मराठी सीजन 3
१९ सप्टेंबर २०२१ रोजी कलर्स मराठी आणि वूट वर महेश मांजरेकर यांनी तिसऱ्यांदा सादरीकरण केले. २६ डिसेंबर २०२१ रोजी ग्रेंड फिनाले आयोजित करण्यात आला होता .BIG BOSS मराठी सीजन 3 च विजेता विशाल निकम आणि जय दुधाने उपविजेते ठरले .कर्णधारपदाचे दावेदार उत्कर्ष आणि मीरा होते.
BIG BOSS मराठी सीजन ४
BIG BOSS मराठी सीजन ४ महेश मांजरेकर यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते.या सीजनची थीम ऑंल इजवेल होती.हाउसमध्ये चाळ थीम होती.हे गोरेगाव येथे होते.बिग बॉस मराठी सीजन ४ चे विजेता अक्षय केळकर आणि उपविजेती अपूर्वा नेमलेकर होती .९९ भाग या सीजन चे झाले.
BIG BOSS मराठी 2024 सीजन 5
BIG BOSS मराठी 2024 सीजन 5 या शो चा २८ जुलै २०२४ रोजी भव्य प्रीमियर कलर्स मराठी आणि जिओ सिनेमा वर आयोजित करण्यात आला होता. रितेश देशमुख पहिल्यांदाच हा शो होस्ट करत आहे. प्रीमियर चा TRP २.४ TVR रेकॉर्ड केला होता जो शोच्या सर्व सीजनपेक्षा जास्त आहे. या सीजनच्या डोळ्याचा लोगो सोनेरी रंगसंगतीचा असून,अनेक उघड्या आणि बंद खिडक्या आहेत आणि डोळ्याला दोन नख आधार देणारी आहेत.या सीजनच्या वीकेंडच्या भागांना भाऊचा धक्का असे नाव देण्यात आले होते.या सीजनची थीम भूलभुलैया आहे.या घराला चक्रव्यूह म्हणतात.
BIG BOSS मराठी 2024 सीजन 5 या सीजनमध्ये सदस्य आहेत -निक्की ताम्बोली,अरबाज पटेल,वर्षा उसगावकर,योगिता चव्हाण , सुरज चव्हाण ,धनंजय पवार,अंकिता वालावलकर,पुरुषोत्तम पाटील, निखील दामले, घनश्याम दरोडे ,आर्या जाधव ,वैभव चव्हाण ,इरिना रुदाकोवा (पहिली फोरेनर सदस्य),जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे ,अभिजित सावंत हे सदस्य आहेत.संग्राम चौगुले याने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. टास्क खेळण्यासाठी २ टीम करण्यात आल्या आहेत .A टीम आणि B टीम .A टीम मध्ये सदस्य आहेत-निक्की ताम्बोली,अरबाज पटेल ,सुरज चव्हाण ,जान्हवी किल्लेकर ,आणि वर्षा उसगावकर .टीम B मध्ये सदस्य आहेत- अंकिता वालावकर ,धनंजय पवार,अभिजित सावंत,पंढरीनाथ कांबळे आणि संग्राम चौगुले .
या सीजनच्या विकेंडच्या भागांना ऍक्टिव्हिटी एरियामध्ये एक विशेष सेटअप तयार केलेला आहे त्याला तंटा घर असे नाव देण्य्त आले आहे.यामध्ये आठवड्यातून प्रश्न विचारणारे गृहस्थ दाखवतील आणि ते ठेवलेल्या वस्तूंवर घेऊन एकमेकांवर राग व्यक्त करतील आणि शेवटी जर त्यामुळे बेल वाजली तर त्यांना BIG BOSS कडून सरप्राइज मिळेन.आर्या जाधव आणि वैभव चव्हाण यांना शो मधन बाहेर काढण्यात आले आहे. निखील दामले आणि योगिता चव्हाण हे देखील यांना ५व्या आठवड्यात बाहेर काढण्यात आले आहे.पुरुषोत्तम दादा पाटील यांनी पहिल्याच आठवड्यात घराचा निरोप घेतला.
बिग बॉस मराठी 2024 सीजन 5 मध्ये दुसऱ्या आठवड्यात अक्षय कुमार,फरदीन खान,वाणी कपूर ,तापसी पन्नू ,अम्मी विरक,आदित्य सील आणि प्रज्ञा जयस्वाल आलते त्यांच्या” खेल खेल मै” या चित्रपटाच्या प्रोमोशन साठी.अक्षय केळकर ,गायत्री दातार,आणि पायाल जाधव हे त्यांच्या अबीर गुलाल या टीवी मालिकेच्या प्रमोशनासाठी तिसऱ्या आठवडयात आले होते .रुक्मिणी खरे,अंबर गणपुले आणि शिल्पा नवलकर त्यांच्या दुर्गा मालिकेच्या प्रोमोशनसाठी आले होते . चौथ्या आठवद्यात कंगना रानोत आणि श्रेयस तळपदे त्यांच्या इमरजनसी चित्रपटासाठी आले होते .अनिता दाते-केळकर आणि संदीप पाठक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि इंद्रायणी मालिकेचे प्रमोशन करण्यासाठी आल होते
उत्कर्ष शिंदे हे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व घरातील सदस्यांना भेटवस्तू घेऊन आले होते .सन्मिता धापटे-शिंदे आणि अक्षय अय्यर साहव्या आठवड्यात आलते.प्रसेन्जीत कोसंबी आणि रवींद्र खोमणे हे देखील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आलते. हे सगळेजण गेस्ट म्हणून आले होते .
जंगल राज’ टास्क हा विशेष टास्क होता, ज्यामध्ये स्पर्धकांना जंगलाचे राज्य मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला,या टास्क मध्ये जिंकल्यास ”खरा शिकारी” कोण ठरणार याबाबत उत्सुकता आहे. या टास्कमुळे घरातील स्पर्धकांमध्ये धुसफूस आणि संघटनांचे वेगळे वेगळे खेळ दिसले. तसेच घरातील स्पर्धकांमध्ये अनेक संघर्ष पाहायला मिळाले .अभिजित सावंत आणि धनंजय पवार यांच्यातील वाद याचा एक महत्वाचा भाग ठरला .घरातील धोरणे आणि गट तयार होण्याच्या प्रक्रियेवर चर्चा झाली ,ज्यामुळे पुढील नामाकांवर याचा परिणाम होईल.या सीजनचे विजेते कोण’ होणार हे पाहणे खूपच मनोरंजक असेन.संभाव्य विजेता अभिजित सावंत असेल
निष्कर्ष
प्रत्येक नवीन सीजनसह ,बिग बॉस नवीन स्पर्धक,अधिक विस्तृत कार्य आणि आश्चर्यकारक ट्वीस्ट आणून स्वताला नवीन बनवतो.नाटक,संघर्ष आणि भावना या मुख्य घटकांची देखभाल करत सतत विकसित होण्याची क्षमता या शोची पुढील अनेक वर्ष भारतीय टेलीवीजनचा मुख्य भाग राहील याची खात्री आहे. BIG BOSS मराठी 2024 हा सीजन सुद्धा तुमच्यासाठी खूप मनोरंजन घेऊन आलेला आहे.
तुम्हाला BIG BOSS आवडतो ,किवा तिरस्कारअसो ,बिग बॉसचा भारतीय मनोरंजन आणि संस्कृतीवर झालेला प्रभाव तुम्ही नाकारू शकत नाही.आणि जोपर्यंत बिग बोसच्या घरामध्ये पुढे काय होते हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तोपर्यंत हा कार्यक्रमा चे प्रेक्षकांच्या मनावर गारुड असेल
FAQS
१. BIG BOSS मराठी 2024 सीजन 5 चे सूत्रसंचालन कोणी केले ?
बिग बॉस मराठी सीजनचे 5 चे सुत्रसंचालन रितेश देशमुख
२.बिग बॉस सीजन ४ चे विजेते कोण होते?
बिग बॉस सीजन ४ चे विजेते अक्षय केळकर आणि उपविजेती अपूर्वा नेमलेकर होती.
3.बिग बॉस सीजन 5 ची थीम काय आहे ?
बिग बॉस सीजन 5 ची थीम भूलभुलैया आहे.