मसाला उद्योग | Masala Business Information in Marathi

 मसाला उद्योग | Masala Business Information in Marathi  :  भारतीय जेवणाची कल्पना मसाल्याशिवाय करूच शकत नाही. प्राचीन काळा पासून मसाल्याचा वापर स्वयंपाक बनवण्यासाठी केला जात आहे.  भारतात  मसाला व्यवसायाची  बाजारपेठ खूप मोठी आहे. भारत देश मसाला उत्पादन आणि मसाला निर्यात यामध्ये अग्रेसर आहे. सर्व कच्चे मसाले एकत्र करून त्याची पावडर करून विविध खाद्य पदार्थाच्या चवी नुसार सहज वापरता येईल असे  मसाले बनविण्याच्या प्रकियेला मसाला उद्योग असे म्हणतात.

प्राचीन काळापासून  विशिष्ट चव येण्यासाठी  स्वयंपाकात मसाल्यांचा वापर केला जात आहे .त्यामुळे विशिष्ट प्रकारच्या मसाल्यांना बाजारपेठेत नेहमीच मागणी असते. जागतिक मसाल्याच्या उत्पादनात भारताचा  वाटा 75 %  आहे. मसाला व्यवसाय हा कमी गुंतवणूक करून सुरु होणारा व्यवसाय आहे. तुम्हांला मसाल्यांचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर  तुम्ही सुद्धा करू शकता मसाला उद्योग | Masala Business Information in Marathi  हा लेख तुमच्यासाठी आहे हा लेख वाचून तुम्हीसुद्धा मसाला व्यवसाय  सुरु करू शकता. 

 मसाला उद्योग | Masala Business Information in Marathi

 मसाला उद्योग | Masala Business Information in Marathi

मसाल्यांना बाजारात खूप मागणी आहे , झटपट किवा तयार मसाल्यांनी गृहिणींच बरच  काम सोप झाले आहे.  मसाल्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे .ब्रँडेड मसाल्यासोबत घरगुती मसाल्यांना सुद्धा चांगली मागणी आहे. कमी गुंतवणूक करून  तुम्ही सुद्धा करू शकता मसाला उद्योग | Masala Business Information in Marathi . मसाला उद्योग सुरु करून तुम्ही चांगले अर्थाजन करू शकता  मसाले उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक गोष्टीची आपण सविस्तर माहिती घेऊयात

कच्चा माल ( Raw Material ): मसाला उद्योगासाठी लागणारा कच्चा माल आपल्या भारत देशामध्ये मुबलक प्रमाणात पिकविला जातो. जिरे ,धने ,मिरची ,लवंग ,हळद ,बडीशेप ,वेलची ,काळे मिरे ,दगडफूल हा कच्चा माल आपल्याकडे सहज उपलब्ध होतो ,तुम्ही मसाला उद्योगासाठी लागणारा कच्चा माल होलसेल मार्केट मधून किंवा शेतकऱ्याकडून खरेदी करू शकता .

तुम्ही खरेदी करत असलेला कच्चा माल हा स्वस्त आणि च्नागल्या प्रतीचा हवा आहे.तुम्हांला कच्चा माल खरेदी करताना त्याची गुणवत्ता तपासून घ्यावी लागेल तुम्ही खरेदी केलेल्या कच्च्या मालावर तुम्ही जे मसाले बनविणार आहात त्यांची गुणवत्ता अवलंबून आहे.

आवश्यक मशिनरी आणि उपकरणे : मसाला व्यवसाय सुरु करण्यासाठी मशिनरी ची आवशकता असते. ह्या मशिनरी कोणत्या आहेत ते आपण पाहूयात

  • क्लीनर मशीन : आपल्या कच्च्या मालामधून खडे ,माती ,दगड वेगळे करण्याचे काम  क्लीनर मशीन करते
  • ड्रायर मशीन : कच्चा माल दळण्याअगोदर तो पूर्णपणे सुकवून त्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी ड्रायर मशीन चा उपयोग होतो.
  • ग्राइंडर मशीन : कच्चा माल दळण्यासाठी ग्राइंडर मशीन चा उपयोग होतो.
  • पॉवर ग्रेडर मशीन : ग्राइंडर मशीन द्वारे दळलेले मसाले फिल्टर करण्यासाठी ह्या मशीन चा वापर होतो. तयार झालेली पावडर वेगवेगळी केली जाते .जाड पावडर वरती राहते आणि बारीक पावडर खाली राहते .
  • पॅकिंग मशीन : आपले तयार झालेले मसाले पॅक करण्यासाठी ह्या मशीन चा वापर होतो.

 मसाला पॅकिंग : मसाला तयार झाल्यावर तुम्हाला त्याची पॅकिंग करणे गरजेचे आहे. बाजारात मसाल्याची विक्री चांगल्या प्रकारे करण्यासाठी तुमच्या मसाल्याची पॅकिंग आकर्षक असणे गरजेचे आहे ,बाजारात मसाल्याच्या अनेक कंपनी आहेत.तुम्हाला त्यांच्या बरोबर स्पर्धा करायची झाल्यास तुमची मसाला पॅकिंग त्यांच्या सारखी आकर्षक असायला हवी.

तुम्ही जर कमी गुंतवणुकीतून व्यवसाय करत असाल तर तुम्ही स्टीकर बनवून ते प्लास्टिक बॅग वर लाऊन त्यामध्ये मसाला पॅक करू शकतो.

 मसाला उद्योग नोंदणी : मसाला उद्योग सुरु करण्यासाठी तुम्हाला फूड लायसन्स घ्यावे लागते. FSSAI : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( Food Safety and Standards Authority of India ).व तसेच उद्योग आधार मध्ये नोदणी करावी लागते. यासह तुम्हाला व्यापार परवाना आणि बीआयएस परवाना घ्यावा लागेल.

तुम्हाला तुमच्या फर्म च्या नावाने बँक मध्ये चालू खाते बनवावे लागेल आणि  पॅनकार्ड सुद्धा बनवावे लागेल. हे सर्व परवाने घेतल्यानंतर तुम्ही तुमचा मसाला उद्योग सुरु करू शकता.

मसाला उद्योग सुरु करण्यासाठी गुंतवणूक : तुम्हाला जर घरगुती स्वरुपात मसाला उद्योग सुरु करायचा असेल तर छोट्या मशिनरी व इतर खर्च मिळून 50-60 हजार रुपये खर्च येऊ शकतो .तुम्ही कमी गुंतवणूक करून जसा तुमचा नफा वाढेल तसे तुम्ही अजून गुंतवणूक करू शकता.

आणि तुम्ही जर मोठ्या प्रमाणात हा उद्योग सुरु करण्याचा विचार करत असाल तर अडीच लाख ते चार लाख रुपये खर्च येऊ शकतो एवढा खर्च करून तुम्ही स्वादिष्ट मसाले बनवून  महिन्याला एक लाख रुपये पर्यंत नफा कमवू शकता.

 मसाला उद्योग | Masala Business Information in Marathi

मसाला उद्योग प्रशिक्षण : तुम्ही सुद्धा प्रशिक्षण घेऊन मसाला उद्योग सुरु करू शकता. मसाले म्हणजे काय ? आणि ते आपण कसे तयार करू शकतो हे समजून घेण महत्वाच ठरत. या क्षेत्रात  रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी आहेत हे ओळखून भारत सरकारने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या खादी ग्राम उद्योग विभागाने ग्रामोद्योग विकास योजना सुरु केली आहे या योजनेद्वारे तुम्ही आठ दिवसाचे प्रशिक्षण घेऊन तुमचा मसाला उद्योग सुरु करू शकता. हे प्रशिक्षण वर्ग सातत्याने चालू असतात .यामध्ये मटण मसाला ,कांदा लसून मसाला ,पनीर मसाला , सांबर मसाला , पाव भाजी मसाला ,चिकन मसाला ,पुलाव मसाला .दुध मसाला ,चहा मसाला  इत्यादी मसाल्यांचे प्रशिक्षण दिले जाते .

मसाला व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य कोठून मिळते ,शासकीय अनुदान याविषयी मार्गदर्शन केले जाते . यामध्ये मसाला निर्मिती आणि इतर कृषी आधारित प्रकिया उद्योगांसाठी सहाय्य केले जाते. यामध्ये प्रशिक्षण, तांत्रिक सल्ला ,सामाईक सुविधा यांचा समावेश आहे.18 ते 55 वय वर्ष वयाच्या व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.  प्रशिक्षण पूर्ण  केल्यानंतर शासनाचे प्रमाणपत्र मिळते  दिलेल्या लिंक वर क्लिक करून https://www.kvic.gov.in करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

मार्केटिंग :  मसाला उद्योग | Masala Business Information in Marathi

प्रत्येक व्यवसायामध्ये मार्केटिंग खूप महत्वाचे असते .मसाला उद्योगांमध्ये सुद्धा मार्केटिंग महत्वाचे आहे . मसाला हा प्रत्येक घरामध्ये रोज वापरला जातो ,लग्न समारंभ ,हॉटेलमध्ये ,मेस या ठिकाणी मसाला वापरला जातो  जिथे जिथे खाण्याचे पदार्थ बनवले जातात तिथे मसाला वापरला जातो.

हल्ली शहरांमध्ये विविध प्रदर्शन आयोजित केले जातात तिथे तुम्ही तुमचा मसाल्याचा स्टॉल लाऊन विक्री करू शकता आणि तुमचा मसाला लोकांपर्यंत पोहचू शकता. तुमचे जर पॅकिंग चांगले असेल तर तुम्ही अमेझॉन,फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनी बरोबर टायप करून तुम्ही तुमची विक्री वाढवू शकता.

Conclusion :  मसाला उद्योग | Masala Business Information in Marathi   ह्या लेखामध्ये आपण मसाला व्यवसाय बद्दल माहिती घेतली तुम्ही मसाला व्यवसाय सुरु केल्यानंतर व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल .सुरवातीला मसाल्यांची विकी कशी करायची हे समजणार नाही पण तुम्ही सतत प्रयत्न करत राहिल्यास हळू हळू विक्री मध्ये वाढ होईल.तुम्हाला संयम ठेवावा लागेल. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये झोकून देऊन काम केले तर यश तुमचेच आहे. अजून काही माहिती हवी असल्यास आमच्याशी संपर्क करू शकता.

FAQ :

1 मसाला उद्योगाचे प्रशिक्षण कोठे मिळेल ?

भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या खादी ग्राम उद्योग विभागातर्फे मसाला उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते. या मध्ये मसाला उद्योगाची सुरवात कशी करायची ,मशिनरी ची माहिती ,मार्केटिंग याची सविस्तर माहिती दिली जाते.

2 मसाला उद्योगासाठी भांडवल किती लागते ?

तुम्हाला छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही 20-25 हजारात सुद्धा हा व्यवसाय सुरु करू शकता.

3 मसाला उद्योग सुरु करण्यासाठी कोणते परवाने आवशक आहेत ?

मसाला उद्योग सुरु करण्यासाठी  शॉपऍक्ट, उद्योग आधार ,फूड लायसन्स ,आणि तुमचे व्यवसायाच्या नावाने बँक मध्ये करंट अकाउंट हवे आहे ,पॅनकार्ड सुद्धा बनवावे लागेल.

 

 

Leave a Comment