महाराष्ट्रातील गडकिल्ले:इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort

 महाराष्ट्रातील गड किल्ले हे महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले यांचे ऐतिहासिक,सांस्कृतिक महत्व अनन्यसाधारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच  हे गड-किल्ले प्रसिद्ध झाले.महाराष्ट्रातील गड-किल्ले हे महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. हे गड किल्ले आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची,पराक्रमाची ,आणि नेतृत्वाची आठवण करून देतात.महाराष्ट्रातील सर्वच किल्ले त्यांच्या निसर्गसौंदर्य आणि सुखद वातावरणासाठी प्रसिद्ध  असल्याने ते ट्रेकिंगसाठी आजही पसंत केले जातात. म्हणूनच आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातील गडकिल्ले: इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort चला तर मग  आपण महाराष्ट्रातील गड किल्ले यांची माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील गडकिल्ले:इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort राजगड

महाराष्ट्रातील गडकिल्ले:इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort  राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यात आहे.राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती.राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. राजगड किल्ल्याची रचना अत्यंत शास्त्रीय आहे.शिवाजी महाराज यांच्या माता जिजाबाई यांचे निवास्थान देखील याच गडावर होते.राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्र्सपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.राजगड किल्ला ट्रेक करून गडाच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी सुमारे २.५ ते 3 तास लागतात.पद्मावती माची,सुवेळा माची, आणि संजीवनी माची अश्या 3 माची आहेत.१६४२ साली राजगड बांधण्यात आला. किल्ला  छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख किल्ला होता.

गडावर जाण्याचा मार्ग

पुणे,पाली,कर्जत,गुंजवणे या बसस्थानकावरून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिहवन मंडळाच्या बस,खासगी वाहन,गाड्या जाऊ शकतात.गडावर जाण्यासठी अनेक मार्ग आहेत.गुप्त दरवाजाने राजगडावर जाता येते.एसटी पुणे-राजगड पकडून वाजेघर या गावी उतरता येते.एक तासाच्या अंतरावर रोलिंग आहे.त्यांच्या साह्याने खूप कमी वेळात राजगडावर जाता येते.3 तास या वाटेने जायला लागतात.२.गुप्त दर्वाजामार्गे सुवेळामाची ,गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्त दरवाजेमार्ग  जाते सुवेळा माचीवर  २५ जणांची राहण्याची सोय होते.

राहण्याची सोय: पद्मावती मंदिरात २५ जणांची राहण्याची सोय होते.पद्मावती माचीवर राहण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.जेवणाची सोय:  आपण स्वतःकरावी. पद्मावती मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याचे बारमाही टाके आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ: ३ तास.

महाराष्ट्रातील गडकिल्ले:इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort रायगड

किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा असून समृद्र् सपाटी पासून सुमारे ८२० मीटर उंचीवर आहे.रायगड चे प्राचीन नाव रायरी होते.किल्ले रायगडचा प्रकार गिरिदुर्ग आहे.रायगडची चढाई तशी सोपी आहे.किल्ले रायगडची स्थापना १०३० मध्ये झाली.छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडला आपली राजधानी बनवली.शिवराज्याभिषेक हा रायगडावर झाला. हा प्रसंग रायगडावर अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. रायगडा वर पोहचण्यास सरासरी दीड ते २ तास लागतो.रायगडावर पाहण्यासारखी खूप ठिकाण आहेत.पाचाडचा जीजाबाईंचा वाडा, खुबलढा बुरुज,नाना दरवाजा,मदर्मोरचा,चोरदिंडी,हत्ती तलाव,गंगासागर तलाव,पालखी दरवाजा,राजभवन,बाजारपेठ,जगदीश्वर मंदिर महाराजांची समाधी,हिरकणी टोक,शिरकाई देऊळ ,महादरवाजा,नगारखाना,रत्नशाळा,वाघ दरवाजा,वाघ कुत्र्याची समाधी.

महाराष्ट्रातील गडकिल्ले:इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort

रायगडावर जाण्यासाठी आता एकूण २ मार्ग आहेत. पायवाट आणि रोपवे.रोपवेच्या सुविधामुळे काही मिनटातच किल्ल्यावरती पोहचता येते.पाली दरवाजाच्या वाटेला किल्ल्याकडे जाण्यासाठी सुमारे १७३७ पायऱ्या आहेत.चोर दरवाजा मार्गावर सारख्याच पायऱ्या आहेत,परंतु त्या अधिक उंच आणि आहावानात्मक आहेत.रायगडावर भेट देण्यासाठी सर्वात्तम वेळ ही ऑक्टोबर ते फेब्रूवारी आहे.

महाड बसस्थानक आणि पोलादपूर बसस्थानक हे सर्वात जवळचे आहेत,जे किल्ल्यापासून अनुक्रमे 25 किलोमीटर  आणि 35 किलोमीटर अंतरावर आहेत.या स्थानकावर मुंबई,पुणे यांसारख्या मोठ्या शहरातील बसेस वारंवार ये-जा करतात.येथून गडावर नेह्ण्यासाठी  देखील उपलब्द आहे.गडावर राहण्याची उत्तम सोय आहे.गडावर एक धर्मशाळा आहे.राहण्याची सोय विनाशुल्क आहे.गडावर खाण्याची सोय आहे पण स्वताच्या सोयीप्रमाणे खायला घेऊन जाऊ शकतात.रायगड किल्ला पाहण्यासाठी साधारण 3-४ तास लागतात.

शिवनेरी

महाराष्ट्रातील गडकिल्ले:इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort  महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्यांपेकी शिवनेरी हा एक महत्वपूर्ण किल्ला आहे.शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात वसलेला १७व्या शतकातील लष्करी किल्ला आहे.शिवनेरी किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग आहे.ह्या किल्ल्याची स्थापना ११७०ला झाली. शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.ज्या खोलीत महाराजांचा जन्म झाला ती खोली जतन केली आहे आणि हजारो शिवप्रेमी  या खोलीला भेट देतात. ह्या  किल्ल्यात   मुघल आणि इतर आक्रमक सैन्याविरुद्धच्या मराठ्यांच्या  प्रतिकाराचे प्रतिक आहे. शिवनेरी किल्ला हा एक डोंगरी किल्लाअसून त्याच्या त्रिकोणी आकाराचे वेशिष्टय आहे.किल्ल्याचे प्रवेशद्वार सात दरवाजे असलेला वळणदार मार्ग आहे, प्रत्येक कमाल सुरक्षिततेसाठी बांधलेला आहे. हा मोक्याचा मार्ग करण्यात आला होता,ज्यामुळे त्यांना किल्ल्याच्या आतील भागात त्वरित प्रवेश करणे कठीण होते.किल्ला मजबूत आणि भव्य भिंतीनी व्यापलेला आहे.

शिवनेरी किल्ल्यातील  प्रमुख आकर्षणे : शिवाई देवी मंदिर,छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान,सात दरवाजे ,कडेलोट पोइंट,गंगा आणि जमुना पाण्याच्या टाक्या,अंबरखाना,धरणीधर बाग.शिवनेरी किल्ला पुणे शहरापासून सुमारे९५किलोमीटर आणि मुंबईपासून अंदाजे १५५ किलोमीटर अंतरावर आहे. या शहरापासूननियमित राज्य परीवाहन बस आणि खाजगी वाहने धावतात.शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी टॅक्सी  किवालोकल बसने जाता येते.शिवनेरी गडावर जाण्यासाठी मुंबईहून माळशेज मार्ग आहे.ह्या मार्गाने गडावर पोहचण्यास मुंबईपासून एक दिवस लागतो.पुण्याहून नारायणगाव मार्ग देखील आहे.

महाराष्ट्रातील गडकिल्ले:इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort .सिंहगड

सिंहगड हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे शहराजवळ सह्याद्री पर्वतरांगांच्या भुलेश्वर रांगेत वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.अनेक लढायाआणि घटनांचा साक्षीदार असलेल्या या किल्याला मराठा इतिहासात खूप महत्व आहे.सिंहगड  हा सुरवातीला कोंढाणा  या नावाने ओळखला जात होता.१६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेतला आणि त्याचे नाव सिह्गड ठेवले,म्हणजे सिहांचा किल्ला.सिह्गडची उंची ४४००फुट इतकी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदाआणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता.या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला त्यावरूनच असे म्हंटले जाते कि या गडाला सिंहगड नाव देण्यात आले. सिंहगडावर पाहण्यासारखी खूप ठिकाणे आहेत जसे की राजाराम महाराज स्मारक,सुभेदार तानाजींचे स्मारक,देवटाके,दारूचे कोठार,कल्याण दरवाजा,कोंडनेश्वर,टिळक बंगला,तानाजी कडा ही सर्व ठिकाणे पाहता येतील .

महाराष्ट्रातील गडकिल्ले:इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort

सिंहगड कसे जाल?

सिंहगड हा पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे.स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किवा नेहरू क्रीडांगणापासून जाणार्या रस्त्याने सिंहगड 35किलोमीटर आहे. स्वारगेट-पुणे-आनंदनगर -वडगाव -खडकवासला -सिंहगड  पायथा ह्या मार्गाने देखील जाता येयीन.

सिंहगड किल्ल्याला भेट वर्षभर कधीही देऊ शकतो.पण स्ग्ल्यत भारी वेळ म्हणजे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर आहे.सिह्गड परिसरात स्वादिष्ट पदार्थ खायचा पर्यटकांना आनंद घेऊ शकतात.जवळचे पानशेत गावअस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी ओळखले जाते.तोंडाला पाणी आणारी कांदाभाजी,भाकरी आणि बेसन चुलीवरच, झुणका भाकरी ह्या सगळ्याची चव पर्यटकांना अनुभवयला मिळते.

महाराष्ट्रातील गडकिल्ले:इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort तोरणा

तोरणा हा पुणे जिल्ह्यातील दुर्गाकोठातील अतिदुर्गम व अतिविशाल गड म्हणून प्रसिद्ध आहे.तोरणा गडाला प्रचंडगड देखील बोलतात.पुणे जिल्ह्याच्या वेळे तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीरांगांमधून दोन पदर निघून पूर्वेला पसरलेले आहे.त्यापेकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत.तोरणा गडाची उंची १४०३ मीटर /४६०४ फुट इतकी आहे.ह्या गडाचा प्रकार गिरिदुर्ग आहे.तोरणा गडाची स्थापना १४७०ते १४८६ मध्ये झाली असावी.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना घेतलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा .हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याला तोरणा नाव ठेवण्यात आले.वयाच्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला.

तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचे मंदिर,झुंजार माची ,तोर्नेश्वर मंदिर,तोरणजाई देवीचे मंदिर,कोकण दरवाजा,बुधला माची,गोन्दाजी भूरूक समाधी स्थळ देखील बघयला मिळतीन.तोरणा गडाला भेट देण्याची उत्तम वेळ पावसाळ्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये.जेवणाची सोय स्वतः करावी.राहण्याची सोय मेंगाई देवीच्या मंदिरात होऊ शकते.पुण्याहून तोरणा गडावर जायला स्वारगेट बसस्थानकावरून वेल्हेला जाणारी बस पोहचते.

तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रातला शेवटचा किल्ला कुठला आहे ते ? चला पाहूया

महाराष्ट्रातील गडकिल्ले:इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला मल्हारगड आहे. मल्हारगड हा मराठा साम्राज्यातील शेवटचा किल्ला आहे.पुणे जिल्ह्यातील सासवडपासून 30 किलोमीटर अंतरावर मल्हारगड हा किल्ला आहे.हा किल्ला पश्चिम घाटावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.हा गड त्रिकोणी आकाराचा असून याचा बाल्लेकीला चौकोनी आकाराचा तट आहे.मल्हारगड हा आकाराने अतिशय लहान किल्ला आहे.साडेचार ते पाच एकर परिसरात हा किल्ला पसरलेला आहे.पानसे गढी ,लक्ष्मी नारायण मंदिर अशी ठिकाण पाहण्याजोगी आहे.या गडाला सोनेरी गड देखील म्हणतात.मल्हारगडाचा प्रकार हा गिरिदुर्ग आहे.या गडाची उंची ३१६६ फुट आहे.मल्हारगडावर जायला दोन वाट आहेत.दीड दोन तासात गडावर जाता येते.

महाराष्ट्रातील गडकिल्ले:इतिहासाची साक्ष | Maharashtra Amazing Fort  महाराष्ट्रातील गडकिल्ले हे राज्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. हे गड किल्ले आपल्यला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची,पराक्रमाची,आणि नेतृत्वाची आठवण करून देतात.या गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे.त्यामुळे,आपण सर्वांनी एकत्र येऊन या गडकिल्ल्यांचे महत्व जाणून घ्यावे,आणि त्यांचे जतन करण्यसाठी प्रयत्न केले  पाहिजेत .

FAQS

१.स्वराज्याची पहिली राजधानी कोणती?

स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती.

२.रायगडचे प्राचीन नाव काय?

रायगडचे प्राचीन नाव रायरी होते.

3.छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला.

४.महाराष्ट्रातील शेवटचा गड कोणता?

महाराष्ट्राचा शेवटचा गड मल्हारगड आहे.

५.छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म कोठे झाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment