तुम्ही जर इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) खरेदी करून होईल बचत पैशाची हा लेख तुमच्या साठी आहे. हा लेख पूर्ण वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल सध्याच्या काळात इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) वापरणे किती फायद्याचे आहे.
सध्या प्रदूषण खूप वाढत आहे. प्रदूषण न वाढण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) हा एक चांगला पर्याय आहे .पेट्रोल च्या सतत वाढणाऱ्या किमती. पेट्रोल चा खर्च आणि इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) चार्जिंग खर्च या दोन्ही मध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग साठी येणारा खर्च खूप कमी आहे.
इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) खरेदी करून होईल बचत पैशाची
प्रदूषण मुक्त : इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) प्रदूषण मुक्त आहे त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. कार्बन डाय-ऑक्साइड सारखे विषारी वायू हवेत मिसळणार नाहीत .हवा शुद्ध राहण्यास मदत होईल .पेट्रोल बाईक मुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान थांबेल
कमी देखभाल : इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) ला कमी देखभाल खर्च असतो .पेट्रोल बाईक ला ५/६ वर्षात जेवढा देखभाल खर्च होतो तेवढ्या पैशात आपण इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) खरेदी करू शकतो. पेट्रोल बाईकला पार्ट ची संख्या १/२ हजार असते पण इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) ला पार्ट ची संख्या 20/25 असते त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) ला देखभाल खर्च खूप कमी असतो
कमी खर्च : इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) चार्जिंग साठी 3 ते ४ युनिट लागतात एक युनिट विजेचा खर्च साधारण ८ रुपये येतो ४ युनिट साठी ३२ रुपये खर्च येतो . इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) चे मायलेज 70 -120 किलोमीटर आहे म्हणजे साधारण 100 किलोमीटर साठी 30 रुपये खर्च येतो या वरून तुमच्या लक्षात येईल इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) खरेदी करून होईल बचत पैशाची
कमी त्रासदायक : इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) आपण कोठेही ,कधीही चार्ज करू शकतो. पेट्रोल वाहना सारखे पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहण्याची आवशकता नाही. इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) चा पेट्रोल वाहना सारखा कोणताही त्रास नाही
सरकारी अनुदान : इलेक्ट्रिक वाहना खरेदी व निर्मिती साठी केंद्र सरकार व राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे . इलेक्ट्रिक वाहन खरेदी साठी सरकारने अनुदान योजना जाहीर केली आहे .
इलेक्ट्रिक वाहनासाठी ( E-Bike ) साठी सरकारकडून अनुदान मिळते . अनुदान प्रत्येक Kwh साठी रुपये 5000 अनुदान मिळते ( तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी किती Kwh आहे त्यानुसार अनुदान ठरते ) https://evincentive.mahadiscom.in/EVCS/evcs?uiActionName=getEvcsApplication ह्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे अनुदान साठी अर्ज करू शकता.
बॅटरी लाईफ व चार्जिंग साठी लागणारा वेळ : इलेक्ट्रिक वाहनासाठी लिथियम आयन बॅटरी ( lithium-ion rechargeable battery ) ह्या बॅटरी ज्यास्त लाईफ असणाऱ्या म्हणून सिद्ध झाले आहे म्हणून ह्या बॅटरी वापरल्या जातात. इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) चार्जिंग साठी साधरण 5/6 तासांचा वेळ लागतो.
पैशाची बचत करून देणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) आणि इलेक्ट्रिक स्कूटर
भारतीय मार्केट मध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत ह्या. इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) खरेदी करून होईल बचत पैशाची जाणून घेऊया तुमच्या फायदेशीर बाईक आणि स्कूटर ची सविस्तर माहिती
टॉर्क क्रेटॉस ( Tork Kratos ) : टॉर्क मोटर्स हि इलेक्ट्रिक वाहन कंपनी ने टॉर्क क्रेटॉस हि इलेक्ट्रिक बाईक भारतात उपलब्ध करून दिलेली आहे. Kratos आणि Kratos R या दोन गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या गाड्यांची किमत १ लाख 60 हजार पासून ते १ लाख 85 हजार पर्यंत आहे .
या गाड्यावर FAME II सबसिडी सुद्धा मिळू शकते. या गाडीला 4 KWh लिथियम बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे . हि बाईक एका सिंगल चार्ज वर 120 ते 180 किलोमीटरपर्यंत ची रेंज देते .या गाडीचा बॅटरी चार्जिंग टाईम 6-7 तासांचा आहे.
Revolt RV400 : Revolt Motors ने भारतीय बाजारपेठेत Revolt RV400 हि इलेक्ट्रिक बाईक सादर केली आहे. ह्या बाईक ची किंमत 1 लाख 25 हजार पर्यंत आहे. हि बाईक दोन प्रकारात उपलब्ध आहे. यात 3.24 KWh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे . एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 150 किलोमीटर ची रेंज मिळते . बॅटरी चार्जिंग टाईम 4-5 तासांचा आहे. या बाईक ची टॉप स्पीड 85 Km/hr आहे.
Ather 450X : Ather Energy कंपनी ने Ather 450X हि इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ह्या स्कूटर ची किंमत 1 लाख 30 हजार ते 1 लाख 60 पर्यंत आहे. हि स्कूटर चार श्रेणी मध्ये उपलब्ध आहे Ather 2.9 kWh, Ather 3.7 kWh – Gen 3, Ather Gen 3 Update, Ather Apex . ह्या स्कूटर ची टॉप स्पीड 90 Km/hr आहे. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 120 किलोमीटर ची रेंज मिळते बॅटरी चार्जिंग टाईम 7-8 तासांचा आहे .
Chetak इलेक्ट्रिक स्कूटर : बजाज कंपनी ची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 1 लाख 30 हजार ते 1 लाख 60 हजार पर्यंत आहे. यात 2. 9 KWh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. ह्या स्कूटर ची टॉप स्पीड 63 Km/hr आहे. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 108 किलोमीटर ची रेंज मिळते बॅटरी चार्जिंग टाईम 5 तासांचा आहे .
TVS iQube : TVS motors कंपनी ने iQube इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे . ह्या स्कूटर ची किंमत 1 लाख 35 हजार ते 1 लाख 55 हजार आहे. या स्कूटर सोबत सरकारची FAME II सबसिडी उपलब्ध आहे . ह्या स्कूटर ची टॉप स्पीड 78 Km/hr आहे . बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर ची रेंज मिळते बॅटरी चार्जिंग टाईम 5 तासांचा आहे . हि स्कूटर तीन श्रेणी मध्ये उपलब्ध आहे.
Conclusion : इलेक्ट्रिक बाईक ( E-Bike ) खरेदी करून होईल बचत पैशाची ह्या लेखा मध्ये आपण इलेक्ट्रिक स्कूटर , बाईक यांची माहिती घेतली. आजच्या काळात पेट्रोल च्या सतत वाढणाऱ्या किंमती पाहता ह्या इलेक्ट्रिक स्कूटर ,बाईक आपल्या पैशाची बचत करून देणाऱ्या आहेत.
Hero Electric ,Ola Electric या सारख्या भरपूर कंपनी आहेत कि ज्या इलेक्ट्रिक बाईक , स्कूटर यांचे उत्पादन करत आहेत .
FAQ
1.इलेक्ट्रिक स्कूटर ,बाईक यांना बॅटरी चार्जिंग साठी किती वेळ लागतो ? इलेक्ट्रिक स्कूटर ,बाईक यांना बॅटरी चार्जिंग साठी 5-6 तासाचा कालावधी लागतो
2.इलेक्ट्रिक स्कूटर ,बाईक खरेदी करताना सरकारकडून सबसिडी भेटते का ?
सरकारडून इलेक्ट्रिक स्कूटर ,बाईक खरेदी करताना सबसिडी भेटते
3.इलेक्ट्रिक स्कूटर ,बाईक चार्जिंग करताना चार्जिंग स्टेशन ची आवशकता आहे का ?
इलेक्ट्रिक स्कूटर ,बाईक चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशन च असावे असे काही नसते आपण आपल्या घरी सुद्धा चार्जिंग करू शकतो आपल्याला पाहिजेल तिथे आपण चार्जिंग करू शकतो .